मोठा भाऊ असूनही वडिलांना अग्नी देऊ दिला नाही, अशोक विखे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 08:42 PM2019-04-16T20:42:06+5:302019-04-16T20:46:58+5:30
कुटुंबात मोठा भाऊ असुनही वडिल असलेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी केला आहे.
अहमदनगर - कुटुंबात मोठा भाऊ असुनही वडिल असलेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी केला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी झालेल्या सभेत अशोक विखे यांनी वरील गौप्यस्फोट केला. अशोक विखे यांनी नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही, याबद्दलही शरद पवार यांचे आभार मानले आहेत. मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार? असा सवालही त्यांनी केला. शरद पवार हे व्यासपीठावर असतानाच विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर आरोप केले आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे निवडणूक लढवित आहेत. त्यांचे काका तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांना राष्ट्रवादीने व्यासपीठावर बोलावून एकच खळबळ उडवून दिली आहे.