आश्रमशाळा लैंगिक शोषण;आणखी चौघे अटकेत

By admin | Published: November 6, 2016 03:17 AM2016-11-06T03:17:25+5:302016-11-06T03:17:25+5:30

पाळा येथील निवासी आश्रमशाळेतील आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून, पीडित मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री पोलिसांनी

Ashram Shala sexual harassment; Four more arrests | आश्रमशाळा लैंगिक शोषण;आणखी चौघे अटकेत

आश्रमशाळा लैंगिक शोषण;आणखी चौघे अटकेत

Next

खामगाव (जि.बुलडाणा): पाळा येथील निवासी आश्रमशाळेतील आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून, पीडित मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री पोलिसांनी मुख्य आरोपी इत्तुसिंग पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आश्रमशाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची तक्रार गुरुवारी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून, मुख्य आरोपी इत्तुसिंग काळुसिंग पवार याने आणखी एका चिमुरडीला आपल्या वासनेची शिकार बनविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी रात्री आणखी चार जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या १७ वर पोहोचली असून, अन्य दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरण उघडकीस आल्यानंतर, शासकीय यंत्रणा हादरली पोलिसांनी शुक्रवारी रात्री बाळकृष्ण धराजी वाघे (६५), अनिल राघोजी कोकरे (३६) साहेबराव रामा कोकरे (४२) आणि मोहन राजाराम कोकरे (५४) या चौघांना अटक केली. या आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)

इतरांसमोर केला अत्याचार !
आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर इतरांसमोर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी दिली.

पीडितेला दोन लाखांची मदत
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी पीडित मुलीस राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे सांगितले.
आश्रमशाळेतील दयनीय अवस्थेबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या मुलीची वैद्यकीय चाचणी अकोला येथील रुग्णालयात तीन महिला डॉक्टरांकडूनच करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ashram Shala sexual harassment; Four more arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.