तहसीलसमोर भरली आश्रमशाळा

By admin | Published: January 17, 2017 01:41 AM2017-01-17T01:41:17+5:302017-01-17T01:41:17+5:30

इंदापूर तहसील कार्यालयासमोर निवासी शाळा भरविण्याचा निर्णय भीमाई आश्रमशाळेच्या चालकांनी घेतला आहे.

Ashramshala full of tehsil | तहसीलसमोर भरली आश्रमशाळा

तहसीलसमोर भरली आश्रमशाळा

Next


इंदापूर : आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी (दि. १६) पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर निवासी शाळा भरविण्याचा निर्णय भीमाई आश्रमशाळेच्या चालकांनी घेतला आहे.
शासनामार्फत मिळणारे शालेय परिपोषणाचे अनुदान तातडीने मिळाले, सेवानिवृत्त दोन स्वयंपाकीच्या जागी स्वयंपाकी नेमण्यात यावेत, महिला अधीक्षकांना दोन वर्षांचा पगार दिला जावा या त्यांच्या मागण्या आहेत.
यासंदर्भात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे म्हणाले, की मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित भीमाई निवासी आश्रमशाळा, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहाशे
विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय परिपोषणाचे अनुदान अद्याप शासनाने दिले नाही. जून महिन्यामध्ये साठ टक्के अनुदान मिळणे गरजेचे होते.
मात्र शासनाने ते अद्याप दिलेले नाही. जानेवारी महिन्यात
संस्थेला सर्व अनुदान मिळणे गरजेचे होते. मध्यंतरीच्या काळात आश्रमशाळेतील दोन महिला स्वयंपाकी सेवानिवृत्त झाल्या.
त्यांच्या जागी दोन स्वयंपाकी शासनाने नेमावेत अथवा संस्थेला नेमण्यासाठी परवानगी द्यावी.
त्यामुळे जोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन
ाुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे मखरे यांनी स्पष्ट केले. यावेळी परिसरातील निवासी शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(वार्ताहर)
>अनिसा मुल्ला या महिला अधीक्षिकांना केवळ मुस्लिम असल्याने पगार दोन वर्षांपासून पगार मिळत नाही. तो देण्यात यावा, या मागणीसाठी अनेक वेळा शासनाकडे निवेदने देण्यात आली. मात्र त्या निवेदनांना कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली.

Web Title: Ashramshala full of tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.