मुंबई ‘इओडब्ल्यू’च्या प्रमुखपदी आशुतोष डुंबरे
By admin | Published: April 29, 2017 03:25 AM2017-04-29T03:25:53+5:302017-04-29T03:25:53+5:30
राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. गुरुवारी रात्री १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
मुंबई : राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. गुरुवारी रात्री १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये १० उपायुक्तांना बढती देण्यात आली आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची (इओडब्ल्यू) धुरा ठाण्यातील सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेच्या प्रमुखपदी औरंगाबाद सहआयुक्त अमितेशकुमार व प्रशासन विभागात अर्चना त्यागी यांची बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील पूर्ण टीम बदलण्यात आली आहे. गृह विभागाने १६ विशेष महानिरीक्षक, सहआयुक्त, १७ अप्पर आयुक्त व १०४ उपआयुक्त, अधीक्षक, अप्पर अधीक्षक दर्जाच्या बदल्या केल्या आहेत.
नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त मधुकर पांडे यांची ठाण्याच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य गुप्तवार्ता विभागातील सहआयुक्त संतोष रस्तोगी यांची बदली केली आहे, तर अर्चना त्यागी यांची पोलीस महासंचालक कार्यालयातील धुरा अनुपकुमार सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नाशिक पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज यांना कोकण परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बनविण्यात आले असून तेथील प्रशांत बुरडे यांची त्यांच्या पदावर बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांची औरंगाबाद परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे, तर अमरावती परिक्षेत्राचे विठ्ठल जाधव यांची पुण्यातील कारागृह विभागात आणि तेथील सी.एच. वाकडे यांची जाधव यांच्या जागी अमरावतीला बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे अजित पाटील यांची पुणे सीआयडीच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रवीण साळुंखे कारागृह विभागात आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रवीण साळुंखे यांची मुंबई कारागृह विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तेथील राजवर्धन यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शहरातील सहआयुक्त सुनील रामानंद यांची पुणे सीआयडीला तर सीआयडी मुंबईचे आर. जी. कदम यांची त्यांच्या जागी बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी : (कंसात कोठून-कोठे)
अप्पर आयुक्त/ उपमहानिरीक्षक : मनोज लोहिया (पूर्व प्रादेशिक मुंबई - मुख्य दक्षता अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ), प्रताप दिघावकर (दक्षिण प्रादेशिक मुंबई - पूर्व प्रादेशिक, ठाणे शहर), आर.डी. शिंदे (मध्य प्रादेशिक, मुंबई - गडचिरोली परिक्षेत्र), रवींद्र सेणगावकर (सोलापूर शहर - दक्षिण प्रादेशिक पुणे शहर), अब्दुर रहेमान (सीआयडी पुणे - वायरलेस, पुणे), प्रदीप देशपांडे (दक्षिण प्रादेशिक पुणे शहर - गुन्हे पुणे शहर), यशस्वी यादव (ठाणे शहर - आयुक्त, औरंगाबाद शहर)
पदोन्नती झालेले अधिकारी दहा पोलीस उपआयुक्त : लखमी गौतम (अमरावती ग्रामीण - पूर्व प्रादेशिक, मुंबई), संदीप कर्णिक (राज्य गुप्तवार्ता मुंबई - एसआरपीएफ, मुंबई), सत्यनारायण (मुंबई शहर - पश्चिम प्रादेशिक, ठाणे शहर), प्रवीण पडवळ (मुंबई शहर - दक्षिण प्रादेशिक मुंबई), एस. जयकुमार (आर्थिक गुन्हे शाखा - मध्य प्रादेशिक मुंबई), एम.बी. तांबडे (कोल्हापूर - आयुक्त सोलापूर शहर), एस.आर. दिघावकर (एसआरपीएफ धुळे-दक्षिण प्रादेशिक, नागपूर शहर), जय जाधव (मुंबई शहर - सीआयडी पुणे), अंकुश शिंदे (नाशिक ग्रामीण - उत्तर प्रादेशिक नागपूर), साहेबराव पाटील (लोहमार्ग नागपूर - पोलीस उपमहानिरीक्षक,कारागृह,औरंगाबाद),
उपआयुक्त, अधीक्षक, अप्पर अधीक्षक : आरती सिंह (सीआयडी नागपूर - औरंगाबाद ग्रामीण), राकेश कलासागर (नागपूर शहर - अकोला), अभिनाश कुमार (नागपूर शहर - अमरावती ग्रामीण), संजय दराडे (एसीबी, नागपूर - नाशिक ग्रामीण), दिलीप झळके (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर - परभणी), एस.के. मीना (अमरावती शहर - बुलडाणा), चंद्रकिशोर मीना (अकोला - नांदेड), बसवराज तेली (पुणे शहर - हिंगोली), रंजनकुमार शर्मा (नागपूर शहर - अहमदनगर), दीक्षितकुमार गेडाम (अंबेजोगाई - सिंधुदुर्ग), दत्तात्रय कराळे (नाशिक शहर - जळगाव), मंजुनाथ सिंगे (गडचिरोली - पालघर), नियती ठाकेर (परभणी - चंद्रपूर), रामनाथ पोकळे (सीआयडी पुणे - जालना), निर्मलादेवी एस (पीसीआर नागपूर - वर्धा), मोक्षदा पाटील (जळगाव - वाशिम), संजय मोहिते (वाहतूक शाखा, मुंबई - कोल्हापूर), अकबर पठाण (यूसीटीसी, फोर्सवन - मुंबई शहर), राजीव जैन (एसआरपीएफ, नवी मुंबई - मुंबई शहर), मनोज पाटील (एसआरपीएफ गोंदिया - मुंबई शहर), डॉ. रश्मी करंदीकर (ठाणे शहर - मुंबई शहर), प्रशांत खैरे (नवी मुंबई - मुंबई), सौरभ त्रिपाठी (अहमदनगर - मुंबई शहर), एन.डी. रेड्डी (औरंगाबाद ग्रामीण - मुंबई शहर), दिलीप सावंत (नवी मुंबई - मुंबई शहर), एस.व्ही. पाठक ( पुणे शहर - मुंबई शहर), दीपक देवराज (पश्चिम रेल्वे मुंबई - मुंबई शहर), संजय येनापुरे (नांदेड - मुंबई), अंकित गोयल (वर्धा - ठाणे शहर), वसंत परदेशी (औरंगाबाद शहर - ठाणे शहर), अमित काळे (राज्य गुप्त वार्ता विभाग - ठाणे शहर), ज्योती सिंह (जालना - पुणे ) बी.जी. गायकर (महाराष्ट्र पोलीस अकादमी - पुणे शहर), अशोक मोराळे (हिंगोली - पुणे शहर), संजय बावीस्कर (बुलडाणा - पुणे शहर), प्रवीण पवार (मुंबई शहर - नवी मुंबई), आर. आर. बनसोडे (सी.आय.डी. कोल्हापूर - नवी मुंंबई), कृष्णकांत उपाध्याय (सांगली - नागपूर शहर), राहुल माकणीकर (जालना - नागपूर शहर), राकेश ओला (मालेगाव, नाशिक ग्रामीण - नागपूर शहर), एस. चैतन्य (धुळे - नागपूर शहर), श्रीकृष्ण कोकाटे (नि.व.स. मुंबई - नाशिक शहर), माधुरी कांगणे (महाराष्ट्र पोलीस अकादमी - नाशिक शहर), विजय मगर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड-गुन्हे, नाशिक शहर), नीलेश भरणे (नियुक्तीच्या प्रतीक्षेत - अमरावती शहर), श्रीकांत धिवरे (नाशिक शहर - अमरावती शहर), दीपाली धाटे (उस्मानाबाद - औरंगाबाद शहर), विनायक ढाकणे (नाहसं औरंगाबाद - औरंगाबाद शहर), पी.एन. कराड (फोर्स वन मुंबई - पश्चिम रेल्वे मुंबई), अजित बोराडे (दौंड - अंबेजोगाई), बच्चन सिंग (औरंगाबाद ग्रामीण - जळगाव), काकासाहेब डोळे (यवतमाळ - लातूर), शशिकांत बोराटे (मुख्य सुरक्षा अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई - सांगली), मिलिंद मोहिते (महाराष्ट्र अकादमी नाशिक-सोलापूर ग्रामीण), तेजस्विनी सातपुते (सीआयडी पुणे- पुणे ग्रामीण), संदीप पखाले (गोंदिया- बारामती ), मंगेश शिंदे (नागपूर ग्रामीण- नांदेड), हरीबालाजी एन. (माजलगाव बीड- गडचिरोली), महेंद्र पंडित (नांदेड- गडचिरोली), संदीप अटोळे (औरंगाबाद शहर- गोंदिया), चिन्मय पंडित (अहमदनगर- वर्धा), संदीप डोईफोडे (नांदेड- बुलडाणा), श्याम घुगे (पोलीस अकादमी, नाशिक- बुलढाणा), हर्ष पोतदार (करवीर, कोल्हापूर - नाशिक ग्रामीण), विवेक पानसरे (अमरावती शहर- धुळे ), राजरोशन (तुळजापूर- वसई, पालघर), लता फड (लातूर- जालना), रोहिदास पवार (पोलीस अकादमी नाशिक- अहमदनगर), राजकुमार शिंदे (पुणे ग्रामीण- यूसीटीसी, फोर्सवन), दीपाली मासिरकर (नागपूर शहर- पोलीस महासंचालक कार्यालय), शशिकांत सातव (गुन्हे अन्वेषण शाखा, मुंबई- पोलीस महासंचालक कार्यालय), शारदा राऊत (पालघर- एसआयडी, मुंबई), प्रशांत होळकर (वाशिम- एसआयडी, मुंबई), योगेशकुमार (वसई- एसआरपीएफ, नागपूर), बी.बी. पाटील (महामार्ग मुंबई मुख्यालय- एसआरपीएफ, दौंड), महेश चिमटे (एसीबी, अमरावती-एसआरपीएफ, अमरावती), हरीश बैजल (एफडीए- एसआरपीएफ, सोलापूर), पी.बी. सावंत (मुंबई शहर- एसआरपीएफ, नवी मुंबई), जावेद अन्वर शकूर (एसआरपीएफ सोलापूर- एसआरपीएफ, गोंदिया), स्वाती भोर (महामार्ग सुरक्षा, नागपूर- पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), संजय जाधव (अहमदनगर- पोलीस प्रशिक्षण, धुळे), पंढरीनाथ पवार (ठाणे शहर- पोलीस प्रशिक्षण, जालना), स्मिता पाटील-नागणे (वर्धा-पोलीस प्रशिक्षण, खंडाळा), तानाजी चिखले (बारामती- पोलीस प्रशिक्षण, लातूर), यशवंत सोळंके (खामगाव- पोलीस प्रशिक्षण, दौंड), अमोघ गावकर (सिंधुदुर्ग- लोहमार्ग नागपूर), जालिंदर सुपेकर (जळगाव- पोलीस अकादमी, नाशिक), किरणकुमार चव्हाण (मुंबई शहर- पीसीआर, नांदेड), पी.आर. पाटील (पुणे शहर- पीसीआर नागपूर), मनीषा डुबुळे (सोलापूर ग्रामीण- पीसीआर नाशिक), चंद्रकांत गवळी (धुळे- पीसीआर, औरंगाबाद), प्रकाश बच्छाव (धुळे- एसीबी अमरावती), संदीप दिवाण (चंद्रपूर- एसीबी, पुणे), प्रशांत मोहिते (यूसीटीसी, फोर्सवन- फोर्सवन मुंबई), व्ही.जी. पाटील (नाशिक शहर- सीआयडी नागपूर), श्वेता खेडकर (बुलडाणा- सीआयडी कोल्हापूर), कल्पना बारावकर (पुणे शहर- सीआयडी पुणे), ए.एच. चावरिया (पुणे शहर - महामार्ग सुरक्षा, पुणे), संजय शिंत्रे (एसआरपीएफ दौंड- महामार्ग सुरक्षा, नागपूर), अमोल तांबे (महामार्ग सुरक्षा पुणे- महामार्ग सुरक्षा मुंबई), योगेश चव्हाण (पोलीस महासंचालक कार्यालय- मानवी हक्क आयोग, मुंबई), एस.एल. सरदेशपांडे (एसीबी पुणे- एफडीआय, मुंबई), प्रवीण पाटील (मुंबई शहर- मुख्य सुरक्षा अधिकारी, विधान मंडळ, मुंबई)