अश्विनी बिद्रे प्रकरणात ब्रेन मॅपिंग टेस्टसंदर्भात युक्तिवाद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:30 AM2017-12-22T03:30:46+5:302017-12-22T03:31:14+5:30
अश्विनी बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांच्या ब्रेन मॅपिंग टेस्टची पोलिसांनी परवानगी मागितली आहे. तपासात आरोपी साथ देत नसल्याने ही मागणी करण्यात आली असून, याकरिता गुरुवारी न्यायालयात दोघा आरोपींना हजर करण्यात आले होते.
पनवेल : अश्विनी बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांच्या ब्रेन मॅपिंग टेस्टची पोलिसांनी परवानगी मागितली आहे. तपासात आरोपी साथ देत नसल्याने ही मागणी करण्यात आली असून, याकरिता गुरुवारी न्यायालयात दोघा आरोपींना हजर करण्यात आले होते. २ जानेवारी रोजी यासंदर्भात युक्तिवाद होणार आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही. शेवटच्या क्षणी आरोपी व अश्विनी बिद्रे यांचे लोकेशन एकाच परिसरात सापडले असल्याने अश्विनी बिद्रे यांचा खून करून त्यांचा मृतदेह भाइंदरच्या खाडीत फेकला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात २ रोजी न्यायालय ब्रेन मॅपिंगची परवानगी देते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.