अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : एकनाथ खडसे यांच्या भाच्याला घेतले ताब्यात, चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:29 AM2017-12-11T04:29:24+5:302017-12-11T04:29:38+5:30

कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Ashwini Bidre missing case: Eknath Khadse's brother held custody, inquiry started | अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : एकनाथ खडसे यांच्या भाच्याला घेतले ताब्यात, चौकशी सुरू

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : एकनाथ खडसे यांच्या भाच्याला घेतले ताब्यात, चौकशी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
२०१५ मध्ये अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, त्या हजर झाल्या नाहीत. त्या काळात राजेश पाटील व अभयकुरुंदकर यांच्यात मोबाइलवर संभाषण झाले होते, तर त्याच कालावधीत राजेश पाटील हे जळगावहून मुंबईत आल्याचे निष्पन्नही झाले आहे. राजेश पाटील यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
अश्विनी आणि अभय कुरु ंदकर यांच्यातील वादाचे सर्व संवाद रेकॉर्डिंग अश्विनीने संगणकात सेव्ह करून ठेवले होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्या वेळी या गोष्टी उघड झाल्या. कुरुंदकर यांच्यातील मोबाइल संवादाचे व काही चित्रफितीचे पुरावेही न्यायालयात सादर केले होते.

 

Web Title: Ashwini Bidre missing case: Eknath Khadse's brother held custody, inquiry started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.