अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:21 AM2017-12-20T02:21:08+5:302017-12-20T02:21:17+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी पनवेल न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
कळंबोली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी पनवेल न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांची सायंकाळी तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली. गरज पडल्यास आणखी दोन दिवस त्यांना पोलीस कोठडीत घेण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.
बारा दिवस पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मंगळवारी मागण्यात आली नाही. कुरुंदकर वापरत असलेली लाल रंगाची गाडी जप्त केली. सांगली येथील रमेश जोशींनी ती कुरुंदकरला भेट दिली होती. त्या गाडीला केमिकल अॅनालिसिससाठी पाठवले आहे तपास अधिकारी प्रकाश निलेवाड यांनी आरोपींच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी भार्इंदर येथील मासेमारांचे जबाब नोंदविल्याचे समजते.