महाराष्ट्र सरकारची घोषणा! आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; बक्षिसात दहा पटीने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 08:04 PM2023-10-20T20:04:47+5:302023-10-20T20:05:20+5:30

महाराष्ट्र सरकारने वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसात दहा पटीने वाढ केली आहे.

 Asian Games 2023 medallists with individual events gold medallist to get Rs 1 crore from maharashtra govt, read here all details |  महाराष्ट्र सरकारची घोषणा! आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; बक्षिसात दहा पटीने वाढ 

 महाराष्ट्र सरकारची घोषणा! आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; बक्षिसात दहा पटीने वाढ 

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना राज्य सरकारने पारितोषिक जाहीर केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या पण पदक जिंकण्यात अपयश आलेल्या खेळाडूंना देखील प्रत्येकी १० लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. खेळाडूंना खुशखबर देताना महाराष्ट्रसरकारने वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसात दहा पटीने वाढ केली आहे.  

यापूर्वी खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम 

सुवर्ण पदक
खेळाडू - १० लाख 
मार्गदर्शक - २.५० लाख

रौप्य पदक - 
खेळाडू - ७.५० लाख 
मार्गदर्शक - १.७५ लाख

कांस्य पदक - 
खेळाडू - ५ लाख
मार्गदर्शक - १.२५ लाख

नवीन आदेशानुसार खेळाडूंच्या बक्षिसात मोठी वाढ (बक्षिसात दहा पटीने वाढ) - 
सुवर्ण पदक -

खेळाडू - १ कोटी
मार्गदर्शक - १० लाख

रौप्य पदक - 
खेळाडू - ७५ लाख
मार्गदर्शक - ७.५० लाख

कांस्य पदक -
खेळाडू - ५० लाख
मार्गदर्शक - ५ लाख

सांघिक क्रीडा प्रकारात पदक जिंकणाऱ्या शिलेदारांना बक्षिसे - 
सुवर्ण पदक -

खेळाडू - ७५ लाख
मार्गदर्शक - ७.५० लाख

रौप्य पदक -
खेळाडू - ५० लाख
मार्गदर्शक - ५ लाख

कांस्य पदक - 
खेळाडू - २५ लाख 
मार्गदर्शक - २.५० लाख 

दरम्यान, यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी विक्रमी कामगिरी करताना १०७ पदके जिंकली. खरं तर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने १५ ते २५ पदकांची कमाई केली. मात्र, मागील चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने ५०+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारताने प्रथमच ७० पदकं जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला असून विक्रमी १०७ पदके जिंकण्यात भारतीय शिलेदारांना यश आले.

Web Title:  Asian Games 2023 medallists with individual events gold medallist to get Rs 1 crore from maharashtra govt, read here all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.