आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ठप्प
By admin | Published: June 6, 2017 02:15 PM2017-06-06T14:15:20+5:302017-06-06T23:43:22+5:30
लासलगाव येथील कांद्याची बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. मागील सहा दिवसांपासून एकही ट्रॅक्टर येथे फिरकलेला नाही
नाशिक : आशियातील सर्वात मोठी बाजारसमिती असलेल्या लासलगाव येथील कांद्याची बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. मागील सहा दिवसांपासून एकही ट्रॅक्टर येथे फिरकलेला नाही. संपूर्ण जिल्ह्यामधील बांधांवरून होणारा कांद्याचा पुरवठा पुर्णपणे थांबला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. लासलगाव बाजारसमितीमधील १५ हजार कोटींच्या व्यवहारांची उलाढाल थांबली आहे. शेतकऱ्यांचे सुमारे शंभर कोटींचे नुकसान झाले असून मोठा फटका शेती व शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या हमाल, मापारी, मालवाहतूकदारांसारख्या घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांचाही व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे संप चिघळु नये आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या संपावर सरकारने तोडगा काढावा, अशीच अपेक्षा राज्यातील बांधाबांधावरून व्यक्त होत आहे.