आशियातील सर्वात लांब डबल डेकर पूल; ११ डिसेंबरला होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 01:34 PM2022-12-05T13:34:59+5:302022-12-05T13:35:36+5:30

सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग तिसरा आणि मेट्रो मार्ग चौथा स्तर सुरू आहे.

Asia's longest double-decker bridge; It will be inaugurated by PM Narendra Modi on December 11 | आशियातील सर्वात लांब डबल डेकर पूल; ११ डिसेंबरला होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन

आशियातील सर्वात लांब डबल डेकर पूल; ११ डिसेंबरला होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन

googlenewsNext

नागपूर - शहरातील चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉर हा आशियातील सर्वात लांब डबल-डेकर (मेट्रो-कम-नॅशनल हायवे) मार्गाचा भाग आहे. याचं येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं उद्धाटन होणार असून हा पूल मेट्रो मार्गांमधील प्रमुख आकर्षण असेल. भारताच्या मेट्रो रेल्वे बांधकामाच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरेल. कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (लाइन-1) आणि झाशी राणी स्क्वेअर ते प्रजापती नगर (लाईन-२) हा मेट्रो मार्ग नागपूरच्या जनतेसाठी खुला केला जाणार आहे. 

चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉरमध्ये जमिनीपासून २८ मीटर उंचीवर थेट रेल्वे ट्रॅक ओलांडून 18.9M रुंद स्टील गर्डरमधून तयार झाले आहे. असे अनोखे बहुस्तरीय परिवहन नेटवर्क देशात प्रथमच पाहायला मिळणार आहे. सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग तिसरा आणि मेट्रो मार्ग चौथा स्तर सुरू आहे. हा एकूण ५.३ किमी असलेला आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे.  

अफकॉन्सने दोन महिन्यांच्या विक्रमी वेळेत १६५० MT वजनाचा हा ८० M डबल-डेकर स्टील स्पॅन उभारला आहे. गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर जिथून दररोज १५० हून अधिक रेल्वे आणि एक लाखाहून अधिक वाहने जातात त्यावरती स्टील सुपरस्ट्रकचर (Steel Superstructure) ठेवण्यात आले. अवाढव्य 18.9M रुंद गर्डरचे लाँचिंग (Girder Launching) ही भारतीय रेल्वेतील बहुधा पहिलीच घटना आहे.

८००० स्ट्रक्चरल घटकांसह १६५० MT स्ट्रक्चरल स्टीलसह तयार केलेला डबल-डेकर ओपन वेब गर्डर (OWG) हा गेल्या हिवाळ्यात गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर ठेवण्यात आला. ह्या मार्गावरील वर्दळ पाहता ही सर्व कामे रेल्वे ब्लॉकच्या वेळेत करण्यात आली. स्पॅन (Span) जमिनीपासून २८ मीटर उंचीवर आहे. इतकं आव्हानात्मक कामाचा भारतात यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नव्हता असं अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण कुमार म्हणाले.

त्याचसोबत आयुष्यात एकदाच येणारे हे आव्हान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. साइट आणि मुख्य कार्यालयातील आमच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त, आम्ही आमच्या तयारीचे गंभीरपणे पुनरावलोकन करण्यासाठी आमच्या चेनाब रेल्वे ब्रिज प्रकल्पाकडून तज्ञांची मदत घेतली. मनुष्यबळ आणि यंत्रे अभूतपूर्व वेगाने एकत्रित करण्यात आली असे प्रकल्प नियंत्रक अमरसिंह राऊत यांनी सांगितले.

ठळक वैशिष्ट्ये
आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट बांधला आहे.
पहिला स्तर राष्ट्रीय महामार्गासाठी तर दुसरा स्तर मेट्रोसाठी असेल
चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉर गड्डीगोदाम क्रॉसिंग येथे आहे
यामध्ये वाहन आणि पादचारी भुयारी मार्ग, रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो यांचा समावेश असेल.
ही अनोखी व्यवस्था ५.३ किमी मेट्रो-कम-राष्ट्रीय महामार्ग डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे.
भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच १८.९ मीटर रुंद स्टील गर्डरचे २८ मीटर उंचीवर थेट रेल्वे रुळांवर लाँचिंग करण्यात आले आहे.
 

Web Title: Asia's longest double-decker bridge; It will be inaugurated by PM Narendra Modi on December 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.