"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 05:54 PM2020-07-06T17:54:15+5:302020-07-06T18:07:13+5:30
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.
अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जात असून कोणतेही मतभेद नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. तसेच, भाजपा सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकुमशाही होती. भाजपाच्या नेत्यांना जरा खासगीत विचारा, ते सुद्धा तुम्हाला असेच सांगतील, असा रोहित पवार यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, "भाजपाकडे सरकारवर टीका करण्यास मुद्दे नाहीत. त्यामुळे समन्वयाबद्दल बोलले जात आहे. मात्र, याला काही अर्थ नाही. भाजपाचे राज्यातील नेते राजकीय पतंग उडवून जनतेची दिशाभूल करत आहेत." याशिवाय, आघाडी सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातात, असे रोहित पवार यांनी सांगितले.
याचबरोबर, येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरातून संजय राऊत यांनी यासंदर्भात म्हटले आहे. याबाबतही रोहित पवार यांनी भाष्य केले. 'भाजपाचा एकूण अनुभव आणि विचारसरणी पाहता ते फार दिवस सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. कर्नाटक, मध्य प्रदेशातही काहीतरी वेडेवाकडे करून भाजपाने सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, असे रोहित पवार म्हणाले. तसेच, याठिकाणी होईल, असे संजय राऊत यांना वाटत असावे. भाजपाबद्दलच्या त्यांच्या अनुभवावरून ते तसे बोलले असावेत. मात्र, भाजपाच्या त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होईल, असे ते म्हणाले नाहीत, असे रोहित पवार यांनी सांगितले.
याशिवाय, कोरोनाच्या मुदद्यावर विरोधकांकडून होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. देशात सर्वाधिक कोरोना टेस्ट महाराष्ट्रात होत आहेत. त्या प्रमाणात रुग्णही वाढत आहेत. राज्य सरकार कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे भाजपाचे नेते पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांबद्दल का बोलत नाहीत, असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी केला.
आणखी बातम्या...
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता
21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत