गरळ ओकणाऱ्याला विचारणा व्हावी -

By Admin | Published: July 8, 2016 09:49 PM2016-07-08T21:49:35+5:302016-07-08T21:49:35+5:30

दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप असलेले ह्यइस्लामिक रिसर्च फाऊंडेशनह्णचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून टीका करण्यात आली आहे.

Ask the thunderbolt - | गरळ ओकणाऱ्याला विचारणा व्हावी -

गरळ ओकणाऱ्याला विचारणा व्हावी -

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर : दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप असलेले ह्यइस्लामिक रिसर्च फाऊंडेशनह्णचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून टीका करण्यात आली आहे. गरळ ओकणाऱ्याला विचारणा व्हायला हवी, असे वक्तव्य संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे. नागपुरातील संत रविदास सभागृहात सामाजिक समरसतेसंदर्भात शुक्रवारी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर प्रसारमाध्यमांजवळ त्यांनी वरील वक्तव्य दिले.
झाकीर नाईकबाबत संघाची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांना केला असता संघ सामाजिक समरसता जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारची गरळ ओकणाऱ्याला विचारणा करायलाच हवी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांच्यावरदेखील टीका केली. झाकीर नाईकला ज्या दिग्विजयसिंग यांनी ह्यमसिहाह्ण म्हटले आहे, त्यांनी झाकीरसोबतच जावे असे जोशी म्हणाले. ढाका हल्ल्यातील अतिरेक्याने आपल्याला झाकीर नाईकच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्याचे चौकशीत सांगितले. तेव्हापासून नाईक हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना डॉ. नाईक यांची भाषणे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Ask the thunderbolt -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.