“कोरोना झाल्यानंतर सचिन तेंडुलकरांनी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 07:59 PM2021-04-15T19:59:11+5:302021-04-15T20:05:06+5:30

sachin tendulkar: सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यांनी कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती, असे वादग्रस्त वक्तव्य ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने केले आहे.

aslam sheikh says sachin tendulkar did not need to get admitted to the hospital after corona positive | “कोरोना झाल्यानंतर सचिन तेंडुलकरांनी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती”

“कोरोना झाल्यानंतर सचिन तेंडुलकरांनी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती”

googlenewsNext
ठळक मुद्देठाकरे सरकारमधील मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्यसेलिब्रिटींनी रुग्णालयांमध्ये येऊन बेड्स अडवू नयेत - शेखगरजूंना रुग्णालयांमध्ये बेड्स मिळणे हे सर्वांत महत्वाचे - शेख

मुंबई: गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात कोरोनाचा कहर कायम आहे. इतकेच नव्हे, तर एकाच दिवशी कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा २ लाखांजवळ पोहोचला. आतापर्यंतची हा उच्चांकी आकडेवारी आहे. सामान्य जनतेपासून अनेक सेलिब्रिटीज, नेतेमंडळी यांनाही कोरोनाची लागण झाली. सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यांनी कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती, असे वादग्रस्त वक्तव्य ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने केले आहे. (aslam sheikh says sachin tendulkar did not need to get admitted to the hospital after corona positive)

काही दिवसांपूर्वी भारतरत्न, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनावर मात करून सचिन तेंडुलकर घरीही परतले. सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रिटीमंडळींना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, यावर ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने टीका केली आहे. 

धक्कादायक! ५ हजारांपैकी केवळ २०० मुंबईचे डबेवाले कार्यरत; कोरोनातील भीषण वास्तव

रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती

आताच्या घडीला मुंबईमध्ये रुग्णालयांची काय अवस्था आहे, हे सर्वांना माहिती आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे बेड्स अपुरे पडत आहे. त्यामुळे जे गरजू लोकं आहेत त्यांना रुग्णालयांमध्ये बेड्स मिळणे हे सर्वांत महत्वाचे आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार सेलिब्रेटींनी नक्कीच करायला हवा. जे सेलिब्रेटी आहेत, ते घरी राहूनही उपचार घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी रुग्णालयांमध्ये येऊन बेड्स अडवू नयेत. सचिन तेंडुलकर किंवा अक्षय कुमारसारखे सेलिब्रेटी रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. मात्र, त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल होण्याची गरज नव्हती, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. 

“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेत सचिन सहभागी

सचिन तेंडुलकर रोड सेफ्टीसाठी क्रिकेट मालिकेत भारताकडून सहभागी झाले होते. या मालिकेनंतर सर्वप्रथम सचिन यांना कोरोना झाला होता. त्यानंतर भारतीय संघातील अन्य खेळाडूंनाही कोरोना झाला. कोरोना झाल्यावर सचिन तेंडुलकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघातील युसूफ पठाण, एस. बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांना कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व जण कोरोनामुक्त झाले आहेत. 
 

Web Title: aslam sheikh says sachin tendulkar did not need to get admitted to the hospital after corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.