लोकमततर्फे अँस्पायर एज्युकेशन फेअर
By admin | Published: June 5, 2014 01:05 AM2014-06-05T01:05:56+5:302014-06-05T01:05:56+5:30
प्रत्येकच क्षेत्रात आता स्पर्धा वाढली आहे. अशा स्पर्धात्मक वातावरणात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटावयचा असेल किंवा उल्लेखनीय कामगिरी करावयाची असेल तर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणे
विविध विषयांवर कार्यशाळा :
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी विशेष मार्गदर्शन
नागपूर : प्रत्येकच क्षेत्रात आता स्पर्धा वाढली आहे. अशा स्पर्धात्मक वातावरणात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटावयचा असेल किंवा उल्लेखनीय कामगिरी करावयाची असेल तर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच लोकमततर्फे अँस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या काँग्रेसनगर येथील प्रांगणात होईल.
एखादा विद्यार्थी ज्या क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याची इच्छा ठेवतो त्याला संबंधित क्षेत्राचे योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. तो त्याचा अधिकारच आहे. पण त्याला खात्रीने योग्य मार्गदर्शन मिळेलच, याची शाश्वती देता येत नाही. भविष्य घडविण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांंंना दिशाहीन करण्याचाही प्रयत्न अनेकदा होत असतो. त्यामुळेच लोकमत अँस्पायरच्या माध्यमातून योग्य करिअर, योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन यांचा सुरेख समन्वय साधल्या जातो आहे. या करिअर फेअरमध्ये विश्वासाने विद्यार्थ्यांंंना समोर जाण्याची संधी आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यात यात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांंंना मिळणार आहे. याचा लाभ घेत विद्यार्थ्यांंंनी आपल्या पालकांसह या लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअरला भेट द्यावी आणि भविष्याची योग्य दिशा निवडावी. यासंदर्भात अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९८२२४0६५६२ आणि ९९२२९१५0३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)