आमचा फायदा होतोय, महाराष्ट्र भाजप त्यांचं समर्थन करो किंवा नाही माझं घेणंदेणं नाही : आसामचे मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 05:15 PM2022-06-25T17:15:22+5:302022-06-25T17:17:57+5:30
शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“गुवाहाटीमध्ये २०० हॉटेल्स आहेत आणि सर्व हॉटेल्समध्ये अतिथी आहेत. आसाममध्ये पूर आहे हे सांगून मी काय त्यांना हॉटेलमधून पाठवून देऊ का? आसामचे लोक त्यांचे पैसे भरत नाहीत, किंबहुना ते त्यांच्याकडून पैसे घेत आहेत,” असं हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
इसमें हमारा फायदा हो रहा है। महाराष्ट्र में भाजपा उनका (शिवसेना के बागी विधायक) समर्थन करे या नहीं करे इसका मुझसे क्या लेना-देना। मैं तो बस इतना ही कहना चाहता हूं कि अगर असम में कोई मेहमान आया है तो उसे सुरक्षा और सहुलियत मिलनी चाहिए: मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, गुवाहाटी
— ANI_HindiNews (@AHindinews) June 25, 2022
“आमचा यात फायदा होत आहे. महाराष्ट्रात भाजप (शिवसेनेचे बंडखोर आमदार) त्यांचं समर्थन करो किंवा नाही, मला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. आसाममध्ये जर कोणी पाहुणे आले, तर त्यांची सुरक्षा आणि त्यांना सोयी मिळाल्या पाहिजेत इतकंच मला म्हणायचं,” असंही त्यांनी नमूद केलं.