मुंडेंविरुद्ध विधानसभा एकवटली

By Admin | Published: July 21, 2016 04:32 AM2016-07-21T04:32:12+5:302016-07-21T04:32:12+5:30

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरुद्ध अख्खे विधानसभागृह एकवटले असल्याचे चित्र आज दिसले.

Assembly assemblies against Munde | मुंडेंविरुद्ध विधानसभा एकवटली

मुंडेंविरुद्ध विधानसभा एकवटली

googlenewsNext


मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरुद्ध अख्खे विधानसभागृह एकवटले असल्याचे चित्र आज दिसले. लोकांचे प्रश्न घेऊन मी मुंडेंच्या कार्यालयात गेले होते पण मला तासभर ताटकळत ठेवण्यात आले, अशी तक्रार करीत भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुंडेंविरुद्ध तक्रारींचा पाढाच वाचला. यावेळी झालेल्या गदारोळात कामकाज एकदा तहकूब करण्यात आले.
नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रातील अनिधकृत बांधकामांविरोधात आयुक्त मुंडे यांनी धडाक्यात कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईच्या उभारणीसाठी तेथील भूमिपुत्रांनी जमीन दिली आहे. त्यांची घरे पाडून टाकण्याची भूमिका आयुक्त घेत आहेत. त्या बाबत मी त्यांच्याकडे गेले असता त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली असे म्हात्रे यांनी सांगताच दोन्ही बाजूंचे सदस्य उभे राहून त्यांना पाठिंबा देऊ लागले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलाही मुंडेंबाबतचा अनुभव चांगल्या नसल्याचे सांगत लोकप्रतिनिधींचा अधिकारी जर असा अवमान करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. तर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही आक्रमकपणे मुंडेंच्या विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला.

Web Title: Assembly assemblies against Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.