विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 10:54 AM2020-07-02T10:54:19+5:302020-07-02T11:10:28+5:30
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाचं लग्न अवघ्या 40 -50 लोकांमध्ये करत साधेपणा जपला आहे.
दिंडोरी - राजकीय नेत्यांच्या मुलांच लग्न म्हटलं की शाही विवाह सोहळा तर होणारच पण यंदा कोरोनाने याही लग्न सोहळ्यांवर गंडांतर आणलं आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी लग्न पुढे ढकललं आहे. याच दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाचं लग्न अवघ्या 40 -50 लोकांमध्ये करत साधेपणा जपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नासाठी कोणाही नेत्यांना व जनतेला प्रत्यक्ष लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नसोहळा ऑनलाईन करत सर्वांना शुभेच्छा देण्याचे आवाहन केले.
झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ यांच्या हळदी समारंभाला कुटुंबीयांसमवेत ठेका धरला. वनारे येथील निवासस्थानी त्यांनी पत्नी व नाती समवेत डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ व करंजाळी येथील पदमकार गवळी यांची कन्या जयमाला यांचा विवाहसोहळा तालुक्यातील करंजाळी येथे अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत पार पडला.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहप्रसंगी वनारे येथील निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत धरला ठेका#CoronaUpdatesInIndia#marriage#NarhariZirwalpic.twitter.com/6rFASITvkt
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2020
झिरवाळ यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याचे फेसबुकद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. सर्व पाहुण्यांनी मास्क घालून लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. तसेच सॅनिटायझर, फिजिकल डिस्टंन्सिंग आदी सुरक्षितता बाळगण्यात आली होती. हा सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे आदींसह सुमारे 27000 नागरिकांनी ऑनलाईन पाहत या नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च
CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ
"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"
"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल