एप्रिलअखेरीस राज्याच्या विधानसभेची निवडणूक होणार?; प्रकाश आंबेडकर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 09:01 AM2023-02-21T09:01:30+5:302023-02-21T09:02:09+5:30
उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितले.
अकोला - महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण पाहता, एप्रिलअखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक झाली तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याचीही शक्यता आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंंबेडकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.
आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे. ही आमची वैयक्तिक युती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही २०२४ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आहे.