विधानसभाध्यक्ष निवडणूक आवाजी मतदानाने!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:47 AM2021-09-23T06:47:44+5:302021-09-23T06:48:33+5:30
विधानसभा नियम समितीच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. विधानसभा नियम समितीच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ११ सदस्यांपैकी ६ सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्यात चार महाविकास आघाडीचे तर डॉ. संदीप धुर्वे व सुधीर गाडगीळ हे भाजपचे सदस्य उपस्थित होते. धुर्वे यांनी प्रस्तावाला विरोध दर्शविला. सत्तारुढ पक्षाला पराभवाची भीती वाटत असल्यानेच हा बदल केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. नियम समितीचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात सादर होईल.