५ वर्षांचे उद्दिष्ट आणि जलसंपदा विभागाच्या कामाचा लेखाजोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 05:05 AM2019-09-15T05:05:20+5:302019-09-15T05:05:25+5:30
५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते
२०१४-२०१९ पाच वर्षांत
२०१५च्या पहिल्या अधिवेशनामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाने पुढील ५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. यामध्ये पाच वर्षांत :-
उद्दिष्ट साध्य
४ २२५ प्रकल्प पूर्ण करण्याचे. ४ १६१ प्रकल्प पूर्ण झाले.
४ २५०० दलघमी पाणीसाठा करण्याचे. ४ २०७० दलघमी पाणीसाठा निर्माण.
४ ७.५ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता करण्याचे. ४ ४.८४ लक्ष हेक्टर क्षमता निर्माण.
४ ४५ लक्ष हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचे लक्ष्य. ४ ४०.५१ लक्ष हे. प्रत्यक्ष सिंचन पूर्ण.
४ सिंचनासाठी निधी कमी पडणार नाही. ४ ४१,४७१ कोटी निधी दिला.
४ थेट खरेदीने भूसंपादन करणार. ४ २७,०७७ हेक्टर विक्रमी भूसंपादन.
>कोणाच्या काळात काय झाले?
काम २००९ ते २०१४ २०१४ ते २०१९
४ प्रकल्पांसाठी खर्च ३४,७७४ कोटी ४१,४७१ कोटी
४ निर्मित सिंचन क्षमता २.२ लक्ष हेक्टर अतिरिक्त ४.८४ लक्ष हेक्टर
४ भूसंपादनावरील खर्च -- १६,६८८ कोटी
४ प्रत्यक्ष सिंचन ३२ लक्ष हेक्टर ४०.५१ लक्ष हेक्टर
४ सुधारित प्रशासकीय मान्यता --- ३१०
४ एकात्मिक जलआराखडा एकही बैठक नाही आराखडा पूर्ण केला
४ देखभाल दुरुस्तीची तरतूद प्रतिवर्ष १५० कोटी प्रतिवर्ष ५५० कोटी
४ अनुशेष निर्मूलन ३९,७४८ हेक्टर ६१,८७४ हेक्टर
>अनुशेष निर्मूलनासाठी प्रयत्न
अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला व
अमरावती या चार जिल्ह्यांतील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात :-
४या चार जिल्ह्यांतील १०२ प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा विशेष कार्यक्रम.
४मागील पाच वर्षांत ८३५३ कोटींची तरतूद.
४५३ प्रकल्प पूर्ण. ६१,८७४ (रब्बी समतुल्य) क्षेत्राचा अनुशेष दूर.
४प्रकल्प निहाय निधी वितरणाचे अधिकार कार्यकारी संचालकांना.
४जून, २०२२ पर्यंत अनुशेष निर्मूलन करण्याचे नियोजन.
४महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचा समावेश बळीराजा जलसंजीवनी योजनेत.