मालमत्ता दोन हजार कोटींची दाखविली केवळ ३३९ कोटी

By admin | Published: August 13, 2014 12:43 AM2014-08-13T00:43:12+5:302014-08-13T00:43:12+5:30

सहकार विभागाच्या दप्तरी राज्यातील भूविकास बँकेची मालमत्ता केवळ ४३९ कोटी ८९ लाख दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही मालमत्ता दोन हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

Assets of Rs 2 thousand crores showed only 339 crores | मालमत्ता दोन हजार कोटींची दाखविली केवळ ३३९ कोटी

मालमत्ता दोन हजार कोटींची दाखविली केवळ ३३९ कोटी

Next

खरा अहवाल दडपल्याचा आरोप : भूविकास बँकेचे शिलकीचे अंदाजपत्रकही तोट्यात
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
सहकार विभागाच्या दप्तरी राज्यातील भूविकास बँकेची मालमत्ता केवळ ४३९ कोटी ८९ लाख दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही मालमत्ता दोन हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. सहकार विभागाने अहवालात वास्तविकता दडपली असून शिलकीचे अंदाजपत्रकही तोट्यात दाखविले आहे.
राज्य शासनाने भूविकास बँकेचे कर्ज वाटप करण्यासाठी अनेक कमिट्या नियुक्ती केल्या. या कमिट्यांच्या अहवालावरून बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चुकीच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी सहकार मंत्र्यांना पत्र लिहिले. त्यात बँकेच्या इमारती वर्दळीच्या ठिकाणी आहेत. पुण्याची इमारत मोक्क्याच्या जागेवर आहे. त्याची किंमत ४०० कोटींच्या घरात आहे. यासोबत राज्यात इतर ठिकाणी बँकेच्या इमारतींची किंमत १६०० कोटींच्या घरात आहे. असे असतानाही बँकेने आपल्या अहवालात मालमत्ता ४३९ कोटी ८९ लाख रुपये असल्याचे दर्शविले आहे. प्रत्यक्ष बाजारदर आणि अहवालातील किंमतीत मोठी तफावत आहे. सभासदांकडून येणारी थकबाकी ५८१ कोटी आहे तर शासनाच्या व्याजमाफीतून ५०० कोटी रुपये मिळणार आहे.
मात्र शासनाने चुकीची आकडेवारी सादर करून बँकेचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. बँकेकडे ६२९ कोटी शिल्लक राहतात. यावर नाबार्ड हमी घेऊन कर्ज वितरणासाठी पैसे देऊ शकते, त्यामुळे बँक बंद करण्याचा निर्णय घेऊ नये असे पत्र शेतकऱ्यांनी सहकार मंत्र्यांना पाठविले आहे. या पत्रावर आर.पी. सांभारे, रामराव राऊत, आनंदराव सुभेदार, विनोद घुईखेडकर, सुधाकर राऊत, पुंडलिक बोक्से, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Assets of Rs 2 thousand crores showed only 339 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.