राज्यात दररोज 1936 कोटींच्या मालमत्तांचे होत आहेत व्यवहार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:42 AM2020-11-03T01:42:26+5:302020-11-03T01:42:48+5:30
Maharashtra : कोरोनामुळे मालमत्तांच्या खरेदी-विक्रीला एप्रिल ते जुलैमध्ये ग्रहण लागले. ऑगस्टमध्ये ८२,१०० मालमता खरेदी-विक्रीची नोंदणी झाली.
मुंबई : मुद्रांक शुल्कातील सवलत आणि कोरोनामुळे कमी झालेल्या किमतीमुळे मुंबईसह राज्यातील मालमत्तांच्या खरेदीत विक्रमी वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात दररोज सुमारे १९३६ कोटी याप्रमाणे तब्बल ५८,१०० कोटी किमतीच्या मालमत्तांची विक्री झाली. मुंबईत रोज ३८६ कोटींचे व्यवहार झाले, उर्वरित महाराष्ट्रात ती रक्कम १५५० कोटी रुपये आहे.
कोरोनामुळे मालमत्तांच्या खरेदी-विक्रीला एप्रिल ते जुलैमध्ये ग्रहण लागले. ऑगस्टमध्ये ८२,१०० मालमता खरेदी-विक्रीची नोंदणी झाली. सप्टेंबरमध्ये ती १,२०,००० तर ऑक्टाेबरमध्ये १ लाख ३० हजारांवर झेपावली. गेल्या वर्षी ऑक्टाेबरच्या (७९,९०१) तुलनेत यंदाचे व्यवहार ६३ टक्क्यांनी वाढले.
- मुंबई शहरात विक्री झालेल्या मालमत्तांची रक्कम सुमारे ११,६०० कोटी आहे. तर, राज्यातील व्यवहारांची रक्कम ४६,५०० रुपये आहे. एकूण ५८,१०० कोटींच्या महसुलात मुंबई शहर वाटा २०% आहे.
- नोंदणीकृत मालमत्तांची संख्या लक्षात घेतल्यास मुंबईचा वाटा फक्त ६ टक्के आहे. मात्र, महानगरीतल्या मालमत्तांचे भाव जास्त असल्याने तेथे हसूल जास्त असताे असे मुद्रांक शुक्ल विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.