दुष्काळग्रस्त मराठवाडयाला साखर कारखान्यांचं सहाय्य
By Admin | Published: April 21, 2016 04:23 PM2016-04-21T16:23:40+5:302016-04-21T16:23:40+5:30
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मदत करण्यासाठी साखर कारखाना प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 - दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मदत करण्यासाठी साखर कारखाना प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
मराठवाड्यात गेली 20 वर्ष साखर कारखानदारी असून ऊस लागवड आहे, तेव्हा कुणी बोललं नाही असं शरद पवार म्हणाले. तसेच, आता मराठवाडा दुष्कळाला ऊस शेती, साखर कारखाने जबाबदार असा निष्कर्ष काढायला मी काही जलतज्ञ राजेंद्र सिंह नाही असा टोलाही पवार यांनी लगावला.
तर, मराठवाड्यात जलसंधारण कामासाठी सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखाने 10 लाख रुपये देणार असून मुख्यमंत्री सहायता निधीत हे पैसे जमा करतिल हा पवारांचा प्रस्ताव मान्य असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच या संदर्भात अधिसूचना काढण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार साखरेविषयी कसलाही निर्णय पवार यांचा सल्ला घेतल्याशिवाय करत नाही, मोदी सल्ला तर घेतात शिवाय पवार यांचा सल्ला घ्या अशा अधिकाऱ्याना सूचना असल्याचं पाटील यांनी सांगितलं.