साहाय्यक आयुक्तास लाच घेताना अटक

By admin | Published: May 9, 2017 02:31 AM2017-05-09T02:31:54+5:302017-05-09T02:31:54+5:30

प्राप्तिकर विभागातील लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या (सेंट्रल एक्साइज) लार्ज टॅक्सपेयर युनिटचा

Assistant Commissioner arrested for taking bribe | साहाय्यक आयुक्तास लाच घेताना अटक

साहाय्यक आयुक्तास लाच घेताना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्राप्तिकर विभागातील लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या (सेंट्रल एक्साइज) लार्ज टॅक्सपेयर युनिटचा (एलटीयू) साहाय्यक आयुक्त अशोक नायक याला सोमवारी सव्वा कोटी रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केली. त्याच वेळी आणखी एका व्यक्तीलाही बेड्या ठोकल्या.
सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१६मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) तक्रारदाराला एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना, २०१७ मध्ये धनंजय शेट्टी याने तक्रारदाराला ईडीमधून बोलत असल्याचे सांगून, प्रकरण मार्गी लावण्यासाठी अशोक नायकला भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, संबंधित व्यक्तीने नायकची भेट घेतली. तेव्हा ईडीच्या प्रकरणातून सुटका करण्यासाठी नायकने त्याच्याकडे १५ कोटी रुपयांची मागणी केली. त्या व्यक्तीने हे पैसे टप्प्याटप्प्याने देण्याची तयारी दर्शवत, सीबीआयकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार, सीबीआयने सापळा रचला. सोमवारी पहिला हप्ता म्हणून सव्वा कोटी रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने नायकला अटक केली. त्याच्यासह लाचखोरीत मदत करत असलेल्या शेट्टीलाही बेड्या ठोकल्या.

Web Title: Assistant Commissioner arrested for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.