लाच मागितल्याप्रकरणी साहाय्यक वनसंरक्षक गजाआड !

By admin | Published: April 28, 2016 10:11 PM2016-04-28T22:11:53+5:302016-04-28T22:11:53+5:30

पातूर जंगल परिसरातील सागवानाची झाडे कापण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार ३00 रूपयांची लाच मागणाºया अकोला वनसंरक्षक कार्यालयातील साहाय्यक

Assistant Engineer GazaAud! | लाच मागितल्याप्रकरणी साहाय्यक वनसंरक्षक गजाआड !

लाच मागितल्याप्रकरणी साहाय्यक वनसंरक्षक गजाआड !

Next
>अकोला: पातूर जंगल परिसरातील सागवानाची झाडे कापण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार ३00 रूपयांची लाच मागणाºया अकोला वनसंरक्षक कार्यालयातील साहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सर्जेराव नाईकवाडे(५२) याला गुरूवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली. या घटनेमुळे वनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाईकवाडेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
वाशिम जिल्ह्यातील एका कंत्राटदाराने पातूर तालुक्यातील जंगल परिसरातील सागवानाची झाडे तोडण्यासाठीचे कंत्राट मिळविले होते.  त्यासाठी त्याला अकोला वनसंरक्षक कार्यालयाच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी वनसंरक्षक कार्यालयाकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज केला होता. नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे काम हे कार्यालयातील साहाय्यक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे याच्याकडे असल्याने कंत्राटदाराने नाईकवाडे याच्यासोबत संपर्क साधला. नाईकवाडे याने कंत्राटदाराला आज, उद्या नाहरकत प्रमाणपत्र देतो. असे म्हणत, काही दिवस ताटकळत ठेवले. कंत्राटदाराने कंटाळून साहेब, तुमची काही डिमांड असेल तसे सांगा, असे नाईकवाडे याला म्हटले. त्यावर साहाय्यक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे याने कंत्राटदाराला एका सागवान झाडाचे १00 रूपये, याप्रमाणे १२३ झाडांच्या कटाईचे १२ हजार ३00 रूपये देण्याची मागणी केली. यासंदर्भात कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी शिवाजी नाईकवाडे याची चौकशी केली असता, त्याने लाच मागितल्याचे समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी गुरूवारी सायंकाळी वनसंरक्षक कार्यालयातून शिवाजी नाईकवाडे याला अटक केली.

Web Title: Assistant Engineer GazaAud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.