१२ वर्षांखालील १५ टक्के मुलांना अस्थमा

By admin | Published: May 2, 2017 04:24 AM2017-05-02T04:24:45+5:302017-05-02T04:24:45+5:30

वाढत्या प्रदूषणासोबतच घरातील धूळ, झुरळ, धूम्रपान व फटाक्यांचा धूरही अस्थमा (दमा) होण्यास कारणीभूत ठरत

Asthma 15% Under 12 Children | १२ वर्षांखालील १५ टक्के मुलांना अस्थमा

१२ वर्षांखालील १५ टक्के मुलांना अस्थमा

Next

नागपूर : वाढत्या प्रदूषणासोबतच घरातील धूळ, झुरळ, धूम्रपान व फटाक्यांचा धूरही अस्थमा (दमा) होण्यास कारणीभूत ठरत आहे. २०२० साली भारत ही अस्थमा रु ग्णांची जागतिक राजधानी बनेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केली आहे. दरवर्षी जगामध्ये १ लाख ८० हजार अस्थमाग्रस्त मुले मृत्युमुखी पडतात. भारतामध्ये सध्या दीड ते दोन कोटी लोक अस्थमाचे रु ग्ण आहेत. यात ५ ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये १० ते १५ टक्क्यांचे प्रमाण आहे.
मे महिन्याचा पहिला मंगळवार हा दिवस जागतिक अस्थमा दिवस म्हणून पाळला जातो. ‘उत्तम वायू चांगले श्वास’ हे या वर्षीचे ‘डब्ल्यूएचओ’चे घोषवाक्य आहे.
या दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’शी बोलताना मेडिकलच्या क्षय व उररोग विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूळ, धूरच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. हा एक जुनाट हट्टी विकार आहे ज्यासाठी दीर्घकाळपर्यंत उपचार घेणे गरजेचे असते. अनेक रुग्ण जरा बरे वाटले की, आपले इन्हेलर तसेच औषधे घेणे बंद करतात. हे धोकादायक ठरू शकते. (प्रतिनिधी)

अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास ‘सीओपीडी’ची भीती

डॉ. पी. भट्टाचार्य म्हणाले, सीओपीडी’ व ‘अस्थमा’च्या रुग्णांची काही लक्षणे सारखीच असतात. यामुळे रुग्णांची योग्य तपासणी करून निदान करणे आवश्यक ठरते. हे दोन्ही आजार असलेल्या ‘अ‍ॅकॉस’चे रुग्ण वाढल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास व औषधे योग्य पद्धतीने न घेतल्यास पुढे ‘सीओपीडी’ होण्याची शक्यता असते. अस्थमावर योग्य औषधोपचार केल्यास तो बरा होऊ शकतो, परंतु सीओपीडी बरा होत नाही त्याला नियंत्रणात ठेवता येते.

अस्थमाचे निदान

च्दमा मोजण्यासाठी ‘पीक एक्सपिरेटरी फ्लो रेट’चा उपयोग केला जातो. आता यात ‘स्पायरोमीटर’ही आले आहे.
च्पीक फ्लो रेट कमी आल्यास ‘लंग फंक्शन टेस्ट’ केले जाते. त्यानंतर आवश्यक औषधोपचार केला जातो.

जगात अस्थमाची स्थिती

जगामध्ये साधारण १० ते १५ कोटी लोक अस्थमाने आजारी आहेत
भारतामध्ये सध्या दीड ते दोन कोटी लोक अस्थमाचे रु ग्ण आहेत.
दरवर्षी जगामध्ये १ लाख ८० हजार अस्थमाग्रस्त मुले मृत्युमुखी पडतात.
जर्मनीमध्ये ४० लाख लोकांना अस्थमा आहे.
पश्चिम युरोपमध्ये अस्थमाचे प्रमाण येत्या १० वर्षात दुपटीने वाढले आहे.
अमेरिकेत १९८० च्या तुलनेत दमा पीडित रुग्णांची संख्या साधारण ६० टक्क्यांनी वाढली आहे.
जपानमध्ये ३० लाख लोक अस्थमाचे रु ग्ण आहेत.
आॅस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुलांमध्ये सहापैकी एकजण अस्थमाने पीडित आहे.
दमाच्या रोकथामावरील खर्च क्षयरोग, एचआयव्हीचा खर्चाएवढा असतो

धोकादायक घटक

घरातील गादी, कार्पेट, इतर धूळ, मांजराचे केस, झुरळ.
घराबाहेरील परागकण.
तंबाकूचा धूर, रासायनिक धूर.
नाक, घसा व फुप्फुसातील जंतुसंसर्ग
वारंवार होणारी सर्दी.
भावनिक उद्वेग, शारीरिक परिश्रम.
आधुनिक शहरीकरण.

Web Title: Asthma 15% Under 12 Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.