खगोलशास्त्रज्ञांना ‘सरस्वती’ देणार दिशा

By Admin | Published: July 14, 2017 06:31 PM2017-07-14T18:31:58+5:302017-07-14T18:31:58+5:30

आकाशगंगांची निर्मिती, कृष्णविवरातून उत्पन्न ऊर्जा (डार्क एनर्जी) तसेच विश्वनिर्मितीमागचे गुढ उकलण्यासाठी झटणा-या खगोलशास्त्रज्ञांना

Astronomers 'Saraswati' direction | खगोलशास्त्रज्ञांना ‘सरस्वती’ देणार दिशा

खगोलशास्त्रज्ञांना ‘सरस्वती’ देणार दिशा

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - आकाशगंगांची निर्मिती, कृष्णविवरातून उत्पन्न ऊर्जा (डार्क एनर्जी) तसेच विश्वनिर्मितीमागचे गुढ उकलण्यासाठी झटणा-या खगोलशास्त्रज्ञांना ‘सरस्वती’च्या निमित्ताने संशोधनाचे व्यापक दालन खुले होणार आहे. आतापर्यंत शोध लागलेल्या आकाशगंगांचा अतिशय घन महासमुहांपैकी (सुपरक्लस्टर) ‘सरस्वती’ हा महासमुह असल्याने खगोल संशोधनाला नवीन आयाम मिळतील, असे मत खगोल तज्ज्ञांनी व्यक्त केले.
 
तसेच या संशोधन प्रकल्पामध्ये सर्व भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश असल्याने देशासाठी अभिमानास्पद शोध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या (आयुका) पुढाकाराने झालेल्या संशोधनात पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर), एनआयटी- जमशेदपूर आणि केरळच्या थोडुपुळा येथील न्यूमन कॉलेजच्या शास्त्रज्ञ व संशोधक विद्यार्थ्यांनी ‘सरस्वती’चा शोध लावला आहे. या महासमुहाचे आपल्यापासूनचे अंतर ४०० कोटी प्रकाशवर्षे एवढे आहे. अमेरिकेतील प्रसिध्द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलने या संशोधनावर मान्यतेची मोहोर उमटवली असून दि. १९ जुलै रोजी हे संशोधन सविस्तरपणे प्रसिद्ध केले जाणार आहे. 
आयुकाचे संचालक प्रा. सोमक रायचौधरी यांचाही या संशोधनप्रक्रियेत सहभाग होता. याविषयी सांगताना ते म्हणाले, आकाशगंगाची निर्मिती कशी होते हे समजण्यासाठी ‘सरस्वती’चा शोध महत्वाचा आहे. शंभर वर्षांनंतर काय होईल, हे समजण्यासाठी सध्या कोणताही मार्ग नाही. त्यासाठी अंतराळातील विविध घडामोडींचा अभ्यास करून त्याचे संकलन करणे महत्वाचे ठरते. त्यादृष्टीने ‘सरस्वती’ला खुप महत्व आहे. भारतीय संशोधन क्षेत्रासाठीही हे महत्वपुर्ण आहे. पुर्वी भारतीय विद्यार्थी-प्राध्यापक परदेशात जावून प्रशिक्षण घेत होते. आता देशांतर्गत त्यासाठी खुप सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना व्यासपीठ मिळू लागले असून आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांमधील सहभाग वाढला आहे. 
 
‘सरस्वती’च्या शोध हा पुर्णपणे भारतीय आहे. यातील सर्व संशोधक देशातील विविध संशोधन संस्थांमधील आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही एक महत्वाची कामगिरी ठरली आहे. त्यामुळे जगभरातून या संशोधनाचे कौतुक होत असल्याचे प्रा. रायचौधरी यांनी सांगितले. प्रा. रायचौधरी यांच्यासह प्रा. जॉयदीप बागची यांच्यासह प्रकाश सरकार, शिशिर सांख्यायन, जो जेकब आणि प्रतीक दाभाडे यांचा सहभाग आहे. या संशोधनासाठी स्लोन डिजिटल स्काय सर्व्हे (एसडीएसएस) या आंतरराष्ट्रीय सुविधेचा उपयोग करण्यात आला.
 
‘सरस्वती’ हे नाव का?
आधुनिक भारतात ‘सरस्वती’ ही विद्या, कला, संगीत आणि निसर्गाची प्राचीन देवता म्हणून तिची पुजा केली जाते. तसेच प्राचीन काळात सरस्वती ही नदी असल्याचाही उल्लेख आहे. अनेक प्रवाह एकत्रित येऊन ही नदी सतत प्रवाही होती. शोध लागलेल्या आकाशगंगांचा महासमूहही विविध तारका समुहांनी एकत्र येऊन तयार झाला असल्यामुळे त्याचे नामकरण ‘सरस्वती’ असे करण्यात आल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
 
असे झाले शिक्कामोर्तब?
प्रा. जॉयदीप बागची यांच्यासह काही शास्त्रज्ञांनी २००० मध्ये महासमुहाविषयी अभ्यास करण्यास सुरूवात केली होती. उपलब्ध माहितीवरून अंतराळामध्ये असा समुह असल्याचा अंदाज त्यांना होता. पण त्यावेळी आवश्यक टेलीस्कोप व साधने उपलब्ध नसल्याने हे संशोधन बारगळे. ‘आयुका’मध्ये २०१३-१४ मध्ये या संशोधनाला गती मिळाली. ‘एसडीएसएस’चा उपयोग करून संशोधनाचा वेग वाढला. आकाशगंगेतील ताºयांची चमक, त्यांचे स्थान निश्चित करण्यात आले. मागील काही वर्षांत झालेल्या संशोधनामुळे माहितीची स्त्रोत मोठा होता. त्याचा आधार घेत महासमुहाचा शोध घेण्यात आला. या संशोधनाचे मुख्य केंद्र आयुका हे आहे. संशोधनाचे काम पुर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्याची त्याची १४-१५ पानांची थोडक्यात माहिती अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलकडे पाठविण्यात आली. तेथील तज्ज्ञांनी सर्व माहितीची पडताळणी करून संशोधनावर शिक्कामोर्तब केले.
 
आता धुसर आकाशगंगांचे निरीक्षण 
‘सरस्वती’ या महासमुहामध्ये अनेक आकाशगंगा असून त्यातील जास्त चमक असलेल्या समुहांचेच निरीक्षण सध्या करण्यात आले आहे. पण कमी चमक असलेल्या आकाशगंगांचे निरीक्षण करता आलेले नाही. हे समुह लांब असल्याने त्याचे निरीक्षण करण्यात अडचणी आल्या. कोणती आकाशगंगा किती लांब आहे, याचा शोध आता पुढील टप्प्यात घेतला जाणार आहे. त्यामुळे आकाशगंगांच्या निर्मितीतील आणखी बारकावे समजण्यास मदत होईल, असे आयसरमधील शिशिर सांख्यायन यांनी सांगितले.
 
आतापर्यंत झालेल्या संशोधनामध्ये केवळ चार आकाशगंगा महासमुहांचा शोध लागलेला आहे. त्यामध्ये आता ‘सरस्वती’ समावेश झाला आहे. हे खुप दुर्मिळ संशोधन आहे. अंतराळामध्ये अनेक आकाशंगा आहेत. त्याची निर्मिती कशी झाली, गुरूत्वाकर्षणाचा परिणाम, डार्क एनर्जी याचे गुढ उकलण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे. 
- शिशिर सांख्यायन, संशोधक, आयसर
 
संशोधनासाठी खुलणार नवे दालन
सरस्वती या आकाशगंगा समूहाच्या शोधामुळे खगोल आणि भौतिक शास्त्राच्या संशोधनाला नवी दिशा मिळणार असून, शास्त्रज्ञांसाठी एक नवे दालन खुले झाले असल्याची प्रतिक्रिया नेहरु प्लॅनेटेरियमचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. 
आपण राहत असलेल्या आकाशसमूहापेक्षा सरस्वतीची व्याप्ती कितीतरी अधिक आहे. प्रथमच इतक्या मोठ्या अकाशसमूहाचा शोध लागला असल्याने, हे संशोधन महत्त्वाचे ठरते.  गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर संशोधन सुरु होते. विशेष म्हणजे हे संशोधन केवळ एखाद्या खगोल संशोधन करणाºया संस्थेने केलेले नाही. त्यावर विद्यापीठांतील खगोल विषयाचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांनी देखील आपले योगदान दिले आहे. अशा प्रकारचे संशोधन विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना देखील उपलब्ध झाले आहे. हे संशोधनाच्या दृष्टीने चांगले निदर्शक आहे. 
सरस्वती हा आकाशगंगा समूह आपल्या आकाशगंगेपासून खूप दूर आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या आकाशगंगेवर होण्याची शक्यता नाही. मात्र, ही घटनाच नवी असल्याने त्यावर विविध अंगाने संशोधन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या शोधाने खगोल आणि भौतिक शास्त्राला नवे परिमाण लाभतील, असे परांजपे म्हणाले.  

Web Title: Astronomers 'Saraswati' direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.