...आता रिन बारमध्ये ‘स्मार्ट फोम’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:01 AM2017-07-30T00:01:04+5:302017-07-30T00:01:04+5:30
राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा
मुंबई : राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. नव्याने दाखल झालेल्या ‘रिन बार’मध्ये साबणातील ‘स्मार्ट फोम’ तंत्रज्ञानामुळे अर्ध्या पाण्यातच कपडे धुता येणे शक्य होणार आहे. हा नव्या तंत्रज्ञानाने उपयुक्त असणारा साबण बाजारात उपलब्ध आहे.
पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी ‘रिन बार’तर्फे जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे. यापूर्वीही ‘रिन बार’च्या वतीने पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. भविष्यातील पाणीसंकटावर उपाय म्हणून अद्ययावत तंत्रज्ञान वापरून, या अभिनव ‘रिन बार’ साबणाची निर्मिती करण्यात आली आहे. या साबणाच्या वापराने दिवसभरात होणारा पाण्याचा वापर अर्ध्यावर येतो, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
जनजागृतीपर अभियानांतर्गत सामान्यांच्या पाणीवापराविषयी सवयी बदलण्यासाठी पुढाकार घेणे आणि दुसºया बाजूला ज्यातून पाणी वाचविता येईल, तो ‘रिन बार’ सामान्यांपर्यंत पोहोचविणे हे दोन टप्पे आहेत, असे या रिन बार साबणाच्या उत्पादनाचे मुख्य अधिकारी विपुल माथुर यांनी सांगितले. याशिवाय रेन हार्वेस्टिंग, पाणीसाठा यांचा विचार करून बंधारे आणि शिवारांचे काम करण्यावरही भर दिला जात आहे. त्यासंबधी राज्यातील खामगाव आणि अन्य काही ठिकाणी प्रकल्प सुरू असल्याचे माथुर यांनी सांगितले.
अभिनव उत्पादनाबद्दल बोलताना, दक्षिण आशियातील रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या प्रमुख मीना राजन म्हणाल्या की, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शाश्वत जीवनावश्यक धोरणानुसार केवळ उत्कृष्ट नाही, तर दर्जात्मक आणि टिकाऊ उत्पादनांवर भर आहे.
‘रिन बार’ हे एक उदाहरण आहे, जे कपडे स्वच्छ आणि चमक देण्याव्यतिरिक्त आता ‘स्मार्ट फोम तंत्रज्ञान’ पुरविणार आहे. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि अभियंते यांच्या चमूने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे ग्राहक कमी पाणी वापराची सवय अंगीकारतील. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईच्या गंभीरतेमुळे होणाºया अडचणी कमी होण्यात मदत होईल.