अटल बिहारी वाजपेंयींची अभ्यासू छाप सभागृहात पडायची - शिवराज पाटील
By admin | Published: August 3, 2016 08:27 PM2016-08-03T20:27:15+5:302016-08-03T20:27:29+5:30
आधी अटल बिहारी वाजपेयी मागे बसायचे पण नंतर त्यांनी वेळ मागितला आणि असे उत्तर दिले की त्यापुढे त्यांनी वेळ मागितला की त्यांना बोलायला मिळायचे अशी आठवण शिवराज पाटील यांनी शेअर केली
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - आधी अटल बिहारी वाजपेयी मागे बसायचे पण नंतर त्यांनी वेळ मागितला आणि असे उत्तर दिले की त्यापुढे त्यांनी वेळ मागितला की त्यांना बोलायला मिळायचे अशी आठवण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी शेअर केली आहे. सभागृहात होणा-या चर्चेवर प्रश्न विचारला असता शिवराज पाटील यांनी ही आठवण सांगितली. लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने शिवराज पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. लोकमतचे पॉलिटिकल एडिटर सुरेश भटेवरा यांनी शिवराज पाटील यांची मुलाखत घेतली.
चर्चेचा स्तर कमी होत चाललाय, हा आरोप मला मान्य नाही. वेळ कमी पडतोय आणि प्रश्न वाढत चालले आहेत. प्रश्नांतील अभ्यासाचा स्तर वाढत जायला हवा. संविधानाचा अभ्यास हवा असं शिवराज पाटील म्हणाले.
काश्मीर प्रश्नावर बोलताना 'नवद्दीत दहशतवाद कमी झाला होता, काश्मीरमध्ये काही लोक रहात होते, त्यावेळी देखील कमी जास्त घटना घडत होत्या, आताही घटना घडतात. पण आता युद्ध व्हायला नको, आणि युद्ध झाले तर आपण लढायला तयार राहावे', असं शिवराज पाटील यांनी सांगितलं आहे. काश्मीर प्रकरणात कोणाचाही दोष नाही असंही शिवराज पाटील बोलले आहेत.