अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:26 AM2018-08-17T04:26:32+5:302018-08-17T04:27:03+5:30
स्वातंत्र्यपूर्व देशाच्या राजकारणात अर्धशतकाहून अधिक काळ अटलजींची कारकीर्द होती.तरीही अटलजी ब्संदर्भहीन झाले नाहीत. उलट, त्यांची जास्तच गरज भासू लागली.
स्वातंत्र्यपूर्व देशाच्या राजकारणात अर्धशतकाहून अधिक काळ अटलजींची कारकीर्द होती.तरीही अटलजी ब्संदर्भहीन झाले नाहीत. उलट, त्यांची जास्तच गरज भासू लागली. म्हणूनच नव्या सहस्रकात प्रवेश करताना देशाचे नेतृत्व अटलजींच्या हाती आले यात आश्चर्य नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, काँग्रेस अजिंक्य वाटत असताना व दीर्घ काळ विरोधी पक्षात बसून राजकारण करावे लागूनही कटुता, हेवेदावे, त्यांच्यात नव्हते. सत्तेतही त्यांच्यातील शालीनता कायमव टिकून राहिली. साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी माझ्या पिढीने अनुभवली. त्यांचे सुसंस्कृत राजकरण हे जवळून बघता आले, याचा खरंच आनंद आहे.