यवतमाळमध्ये एटीएमची तोडफोड

By admin | Published: November 16, 2016 06:38 AM2016-11-16T06:38:21+5:302016-11-16T06:38:21+5:30

पाचशे व हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी, पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँका व एटीएमसमोरील रांगा कायम आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने

ATM breakdown in Yavatmal | यवतमाळमध्ये एटीएमची तोडफोड

यवतमाळमध्ये एटीएमची तोडफोड

Next

रूपेश उत्तरवार / यवतमाळ
पाचशे व हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी, पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँका व एटीएमसमोरील रांगा कायम आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने मंगळवारी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये तोडफोड केली. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
यवतमाळातील दारव्हा मार्गावर एका हॉटेलनजीक पंजाब नॅशनल बँकेची नवी शाखा सुरू झाली. त्याच्या बाजूलाच एटीएम आहे. या एटीएमसमोर ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून रोज ४०० ते ५०० ग्राहकांची गर्दी असते. मंगळवारी दुपारीही मोठी रांग होती. रांगेतील एका युवकाने आपला नंबर केव्हा लागणार, असे म्हणत एटीएमच्या दाराला जोरदार लाथ मारून काचांची तोडफोड केली. तेथील सायरन वाजल्याने तो पळून गेला. बँकेचे शाखा व्यवस्थापक राम खांब यांनी समोरच असलेल्या यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याला या तोडफोडीची सूचना दिली. मात्र घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगून त्यांनी कारवाईस असमर्थता दर्शविली.
व्यवस्थापक राम खांब यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, तोडफोडीनंतर आपण लोकांना पैसे काढणे थांबविण्याची विनंती केली. मात्र लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. चार तास लोटूनही पोलीस न आल्याने एटीएममधील रोकड असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. किमान गर्दी ओसरेपर्यंत दोन पोलिसांची सुरक्षा पुरवावी, अन्यथा एटीएम चालविणे कठीण जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: ATM breakdown in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.