वाझेंवरून वातावरण तापले, राजकीय खलबतांना वेग; शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:33 AM2021-03-16T02:33:49+5:302021-03-16T06:57:35+5:30

भाजपच्या आरोपांना चोख उत्तर द्या, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आदेश; देशमुखांच्या राजीनाम्याची शक्यता राष्ट्रवादीने फेटाळली

The atmosphere heats up over sachin vaze , the political turmoil accelerates; Sharad Pawar's discussion with the Chief Minister | वाझेंवरून वातावरण तापले, राजकीय खलबतांना वेग; शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

वाझेंवरून वातावरण तापले, राजकीय खलबतांना वेग; शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Next


मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, सोमवारी महाविकास आघाडीतील घडामोडींनाही वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एक तास चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी सायंकाळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेत भाजपच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर द्या, उगाच बॅकफूटवर जाण्याची गरज नाही, असा आदेश दिल्याचे समजते.  (The atmosphere heats up over sachin vaze , the political turmoil accelerates; Sharad Pawar's discussion with the Chief Minister)

शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळलेली स्फोटके व त्यानंतरच्या घटनाक्रमात कितीही मोठे अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या वावड्या
- सचिन वाझेंबाबत होत असलेले आरोप, शिवसेनेचे एक मंत्रिपद रिक्त असणे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची अटकळ लावली जात होती. 
- अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटविण्यात येणार असल्याच्या वावड्याही उठल्या. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी वाझे प्रकरणावरून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती फेटाळली.

बडे अधिकारी गोत्यात?
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात वेळोवेळी योग्य भूमिका मांडली. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील म्हणाले. त्याचवेळी जे कुणी अधिकारी चौकशीत दोषी आढळतील त्यांना प्रायश्चित्त घ्यावे लागेल, असे सांगत त्यांनी काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांबाबत कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत दिले. सचिन वाझे प्रकरणात मंत्र्यांचा बळी कशासाठी द्यायचा, असा मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये आहे. 

मुख्यमंत्र्यांना भेटले पटोले 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात सध्या चर्चा नाही. सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील,  ते तुम्हाला लवकरच कळतील, असे ते म्हणाले. 
 

 

Web Title: The atmosphere heats up over sachin vaze , the political turmoil accelerates; Sharad Pawar's discussion with the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.