संतती प्राप्त करुन देण्याच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार

By admin | Published: July 29, 2016 07:49 PM2016-07-29T19:49:05+5:302016-07-29T22:30:18+5:30

तीन वर्ष उलटूनही त्यांना मुल झाले नव्हते. हताश झाल्याने त्यांनी एका ओळखीने 2015 मध्ये या कुपेकर या मांत्रिकाचा सल्ला घेतला. सुरुवातीला केवळ काही मंत्र त्याने दिले.

Atrocities against the marriage in the name of receiving offspring | संतती प्राप्त करुन देण्याच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार

संतती प्राप्त करुन देण्याच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार

Next

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २९ : संतान प्राप्तीसाठी स्वत:समक्ष दाम्पत्याला शरीरसंबंध ठेवायला भाग पाडून नंतर विवाहितेवरही लैंगिक अत्याचार करणा:या योगेश कुपेकर (49) या तथाकथित मांत्रिकाला वर्तकनगर पोलिसांनी पनवेल येथून गुरुवारी अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.

या घटनेमुळे पीडित महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. एका नामांकित वित्त कंपनीत विकास अधिकारी असलेल्या सावरकरनगर येथील एका दाम्पत्याचा विवाह 2013 मध्ये झाला होता. तीन वर्ष उलटूनही त्यांना मुल झाले नव्हते. हताश झाल्याने त्यांनी एका ओळखीने 2015 मध्ये या कुपेकर या मांत्रिकाचा सल्ला घेतला. सुरुवातीला केवळ काही मंत्र त्याने दिले.

नंतर मात्र त्याने आपण सांगू तसे केल्यास तुम्हाला हमखास मुल होईल, अशी शाश्वती त्यांना दिली. आपल्याला मूल होईल या भाबडया आशेपोटी या महिलेचा पतीने बाबावर विश्वास ठेवला. बाबा सांगेल तसे तो वागू लागला. तुङया पत्नीच्या शरीरात काही व्याधी असून त्या काढण्यासठी तुम्हाला माङया समक्ष शररीसंबंध ठेवावे लागतील, अघोरी सल्लाच त्याने त्यांना दिला. पत्नीच्या विरोधाला न जुमानता नाईलाजास्तव पतीने त्यालाही संमंती दिली. गेल्या दीड वर्षात त्याने अनेकदा त्यांना असे करायला भाग पाडले. नंतर स्वत: काही तंत्रमंत्र करीत असल्याचे ढोंग केले. यादरम्यान त्याने या दाम्पत्याकडून दहा हजार रु पये देखिल त्याने उकळले.

24 जुलै रोजी सावरकरनगर येथील त्यांच्या घरी जाऊन त्याने पुन्हा तेच कृत्य करायला त्यांना भाग पाडले. त्यानंतर पतीला बाहेर पाठवून आता काही मंत्रोपच्चर करायचे असल्याची त्याने बतावणी केली. पती घराबाहेर असल्याची संधी साधून त्यांनेही तिच्याशी लैंगिक चाळे सुरु केले. या प्रकाराने प्रचंड संतापलेल्या या महिलेने हा प्रकार लगेच आपल्या पतीला सांगितला. तिच्या रडण्याने आणि आत्महत्या करण्याच्या धमकीने पतीने याबाबत पोलिसांतही तक्रार केली.

वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावित यांच्या पथकोन पसार झालेल्या कथित भोंदू कुपेकर बाबाला पनवेल येथे गाठून 28 जुलै रोजी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, फसवणूक, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याने आणखीही कोणाची अशा प्रकारे फसवणूक किंवा लैंगिक छळवणूक केली आहे का? याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले

पीडित कुटुंबांनी अशा भोंदू बाबांच्या आहारी न जाता योग्य मार्ग निवडावा, वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करावेत. तसेच अशा काही तक्र ारी असतील तर त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Web Title: Atrocities against the marriage in the name of receiving offspring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.