लग्नाच्या अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Published: September 11, 2016 07:43 PM2016-09-11T19:43:51+5:302016-09-11T19:43:51+5:30

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ढोकाळी नाका येथे घडली. अत्याचार करणा:यास या मुलीसोबत एका महिलेने पाहिल्यानंतर त्याने तिथून पळ काढला.

Atrocities against a minor girl by showing unmistakable marriage | लग्नाच्या अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाच्या अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. ११ : अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ढोकाळी नाका येथे घडली. अत्याचार करणा:यास या मुलीसोबत एका महिलेने पाहिल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. विलास ऊर्फ संतोष संजय पवार (22, रा. ढोकाळी) असे यातील कथित आरोपीचे नाव आहे. तो मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रहिवाशी आहे.

ठाण्यात नोकरीच्या निमित्ताने आल्यामुळे त्याच्या मेव्हण्याने (बहिणीच्या पतीने)त्याला जवळच मनोरमानगरात भाडय़ाने खोली घेऊन दिली होती. तिथे तो आणि मेव्हण्याचा भाऊ वास्तव्याला होते. दरम्यान, तिथून जवळच राहणा:या एका 14 वर्षीय मुलीला त्याने लगआचे अमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळयात ओढले. नंतर तिला दमदाटी करीत त्याने त्याच्या घरात तिच्यावर गेल्या महिनाभरापासून लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कोठे वाच्यता न करण्याचीही त्याने तिला धमकी दिली. एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार 9 सप्टेंबर रोजी आल्यानंतर ही बाब उघड झाली.

अखेर तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग आई-वडिलांनाही सांगितला. त्यांनी तिला विश्वासात घेत याप्रकरणी 10 सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विलासविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, बलात्कार आणि धमकी देणो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण बनगोसावी हे याप्रकरणी तपास करीत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली असून, त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी दिली

Web Title: Atrocities against a minor girl by showing unmistakable marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.