Atrocity Act:लोकांसमक्ष जातिवाचक शिवीगाळ केली तरच ॲट्रॉसिटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:50 AM2022-06-24T06:50:53+5:302022-06-24T06:51:49+5:30
Atrocity Act: लोकांपुढे जातिवाचक शिवीगाळ केली तरच, ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(आर)(एस) अंतर्गत गुन्हा लागू होतो, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
नागपूर : लोकांपुढे जातिवाचक शिवीगाळ केली तरच, ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(आर)(एस) अंतर्गत गुन्हा लागू होतो, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
अमरावतीतील धारणी पोलिसांनी गोपीबाई कासदेकर यांच्या तक्रारीवरून ॲड. धर्मेंद्र सोनी यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविला होता. गोपीबाई गॅस सिलिंडर घेण्यासाठी सोनी यांच्या भावाच्या एजन्सीमध्ये गेल्या होत्या. सोनी यांनी गोपीबाईंना जातिवाचक शिवीगाळ केली, असा आरोप होता. गुन्हा लागू होण्यासाठी संबंधित घटना लोकांपुढे घडणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले.