अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - आठवले

By admin | Published: September 11, 2016 03:56 AM2016-09-11T03:56:03+5:302016-09-11T03:56:03+5:30

कोपर्डीची घटना आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा यांचा दूरपर्यंत काही संबध नाही. या घटनेच्या नावाखाली मोर्चे काढून कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे

The Atrocity Act will not be repealed - Athawale | अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - आठवले

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - आठवले

Next

पुणे : कोपर्डीची घटना आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा यांचा दूरपर्यंत काही संबध नाही. या घटनेच्या नावाखाली मोर्चे काढून कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, कितीही मोर्चे काढले तरी संसदेने दलितांना संरक्षण देण्यासाठी तयार केलेला हा कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. कायद्याचा गैरवापर होत असल्याचे काही जण वांरवार सांगत आहेत. अशा घटना घडत असतील तर त्यांनी त्या दाखवून द्याव्यात आपण स्वत: कायद्यात बदल करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे ते म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चर्चेत ते बोलत होते. आठवले म्हणाले , ‘कोपर्डी घटनेतील आरोपी दलित आहेत. या घटनेनंतर रिपाईच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पोलिसांसमोर हजर केले. त्यामुळे याला जातीय राजकरणाचा रंग देणे योग्य नाही. राज्यात मराठा आणि दलित एकत्रित आल्यास मोठी ताकद उभी राहणार आहे.’ (प्रतिनिधी)

Web Title: The Atrocity Act will not be repealed - Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.