एटीएसची टीम उत्तर प्रदेशला

By admin | Published: September 15, 2014 04:02 AM2014-09-15T04:02:54+5:302014-09-15T04:02:54+5:30

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटची एक टीम उत्तर प्रदेशला रवाना झाली आहे.

ATS team in Uttar Pradesh | एटीएसची टीम उत्तर प्रदेशला

एटीएसची टीम उत्तर प्रदेशला

Next

पुणे : उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटची एक टीम उत्तर प्रदेशला रवाना झाली आहे. बॉम्ब तयार करत असतानाच हा स्फोट झाल्याचे तपासामध्ये समोर आले असून बॉम्ब तयार करणाऱ्यांमध्ये गेल्या वर्षी मध्यप्रदेशातून पळालेल्या सिमीच्या पाच दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पुणे स्फोटात त्यांच्या सहभागाची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अस्लम अय्यूब, जाकिर, महबूब, सलीक, अमजद आणि एजाजुद्दीन अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यामधील महबूब उर्फ गुहा हा अहमदाबाद येथे २००९ साली झालेल्या साखळी स्फोटांतील आरोपी असल्याची माहिती आहे. उत्तरप्रदेशात मोठा घातपात घडविण्यासाठी बॉम्ब तयार करीत असतानाच अचानक स्फोट झाला. जखमी झालेल्या साथीदारांना बाहेर काढून त्यांनी प्रेशर कुकर फुटल्याची माहिती दिली होती. जवळच्या रुग्णालयात उपचार घेऊन हे सर्वजण पसार झाले होते. हे आरोपी जेथे रहात होते त्या घरामधून पोलिसांनी ९ एमएमची पिस्तुल, लॅपटॉप, मोबाइल, सिमकार्ड, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी साधने, गॅस सिलेंडर आणि तीन ओळखपत्र जप्त केली आहेत. या ओळखपत्रांवर हिंदू नावे लिहिलेली आहेत.
गेल्या वर्षी १ आॅक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या खंडवा तुरुंगातून पळालेल्या सात कैद्यांपैकी सहा कैदी सिमीचे कार्यकर्ते होते. त्यांचा म्होरक्या अबु फैजल याच्यासह दोघाजणांना अटक करण्यात आली होती. परंतु अन्य पाचजण अद्यापही सापडलेले नाहीत. बिजनोर येथील बॉस्फोटात त्यांचाच सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचप्रमाणे पुणे येथील बॉम्बस्फोटाशी या आरोपींचा काही संबंध आहे काय हे तपासण्याचे काम सुरु आहे. पोलिसांचा त्यांच्यावरचा संशय बळावत चालला असून पुढील तपासासाठी एटीएसच्या पुणे युनिटची एक टीम उत्तरप्रदेशला रवाना झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: ATS team in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.