एटीएसच्या पुण्यातील अधिकाऱ्याला धमकी

By admin | Published: January 14, 2016 12:37 AM2016-01-14T00:37:00+5:302016-01-14T00:37:00+5:30

‘इसिस’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांचे मत परिवर्तन करणाऱ्या पुणे दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) कार्यालय व तेथील उपअधीक्षक भानुप्रताप बर्गे यांना ठार मारण्याची धमकी देणारे

ATS threatens Pune's officer | एटीएसच्या पुण्यातील अधिकाऱ्याला धमकी

एटीएसच्या पुण्यातील अधिकाऱ्याला धमकी

Next

मुंबई : ‘इसिस’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांचे मत परिवर्तन करणाऱ्या पुणे दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) कार्यालय व तेथील उपअधीक्षक भानुप्रताप बर्गे यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना मिळाले आहे. पत्रावर कोणत्याही संघटनेचे नाव नसलेतरी ‘इसिस’च्या समर्थकांकडून ते आल्याची शक्यता आहे.
इसिस या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असलेल्या पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील तरुणीचे एटीएसच्या पुणे विभागाने नुकतेच मत परिवर्तन करुन तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. अशाच प्रकारे धार्मिक भूलथापांना बळी पडून तरुण-तरुणींनी अतिरेकी संघटनांच्या संपर्कात राहू नये, यासाठी पुणे एटीएस पथक विशेष कार्यशाळा, उपक्रम राबवित आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या नावे चार दिवसांपूर्वी मुख्यालयात एक निनावी पत्र आले. त्यामध्ये पुणे एटीएस कार्यालय व तेथील भानूप्रताप बर्गे हे आमच्या मोहिमेमध्ये विघ्न आणत आहेत, त्यांना योग्य धडा शिकवू, कार्यालय तसेच बर्गे यांचे कुटुंबीय बॉम्बने उडवून देवू, अशी धमकी देण्यात आली आहे. पत्राच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी तातडीने शहानिशा सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे एटीएस व पुणे पोलीस आयुक्तांना कळविण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास पुण्यातील विशेष शाखेचे उपायुक्त पाठक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बर्गे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हे पत्र कोठून आले, कोणी लिहिले आहे, याचा तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

धमक्यांना भीक घालत नाही
दहशतवादी कारवाया, घातपाती कृत्यांना आळा घालण्याचे आपले प्रयत्न कसोशीने सुरू राहणार आहेत. आपण कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. आमच्याकडेही अद्यावत हत्यारे असून आम्ही सुसज्ज आहोत.
- भानूप्रताप बर्गे, उपअधीक्षक, पुणे एटीएस

Web Title: ATS threatens Pune's officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.