कैद्याचा अधिकारी, कॉन्स्टेबलवर हल्ला

By admin | Published: March 3, 2017 05:45 AM2017-03-03T05:45:32+5:302017-03-03T05:45:32+5:30

एका कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्रासारख्या स्टीलच्या पट्टीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी कारागृहात घडली.

The attack on the constable, constable | कैद्याचा अधिकारी, कॉन्स्टेबलवर हल्ला

कैद्याचा अधिकारी, कॉन्स्टेबलवर हल्ला

Next


ठाणे : बलात्काराच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदीवान असलेल्या एका कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्रासारख्या स्टीलच्या पट्टीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी कारागृहात घडली. यामध्ये अधिकारी आणि कॉन्स्टेबल जखमी झाले असून याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तुरुंग अधिकारी संभाजी पिसे आणि कॉन्स्टेबल सुभाष राबडे अशी जखमींनी नावे आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ९.५० च्या सुमारास पिसे हे गुरुवारी सकाळी कारागृहातील सुरक्षा क्रमांक २ (बॅरेक) येथे राउंड घेत होते. या वेळी अचानक हल्लेखोर अरमान खानने (२९) धावून येत, हातातील पट्टीने त्यांच्यावर हल्ला केला. याचदरम्यान, मदतीसाठी धावून गेलेल्या कॉन्स्टेबल राबडे यांच्यावर त्याने हल्ला केला. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्याला मोक्कांतर्गत बंदीवान असलेल्या गोपाळ शेट्टीने भडकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिसे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी अरमानचा ताबा मिळावा, अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहे. तर, अरमान याच्यावर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात पोक्सो अ‍ॅक्टसह बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)
आधीही वाद
बलात्काराचा आरोप असलेल्या अरमान आणि चोरीचा आरोप असलेल्या शेट्टी याच्यासह इतर दोघांना मुंबईतील आॅर्थर जेलमधून जुलै २०१६ मध्ये ठाण्यातील कारागृहात रवानगी केली. ही रवानगी मे २०१६ मध्ये त्या कारागृहात झालेल्या वादातून केली होती. तेव्हापासून अरमान येथे कच्चा कैदी म्हणून शिक्षा भोगत आहे. नोव्हेंबर महिन्यात अरमानचा चित्रपट पाहण्यावरून एकाशी वाद झाला. तेव्हापासून त्याला कारागृहातील वेगळ्या ठिकाणी ठेवले होते. बुधवारीच त्याला सुरक्षा क्रमांक २ येथे इतर कै द्यांसोबत ठेवण्यात आले आहे.

Web Title: The attack on the constable, constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.