अल्पवयीन मुलाचा मोलकरणीवर हल्ला
By admin | Published: June 26, 2014 01:22 AM2014-06-26T01:22:37+5:302014-06-26T13:03:04+5:30
शाळेला दांड्या मारत असल्याची तक्रार वडिलांकडे करण्याबाबत दटावणा-या घरातील मोलकरणीवर १४ वर्षीय मुलाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना चेंबूर येथे घडली.
Next
>मुंबई : शाळेला दांड्या मारत असल्याची तक्रार वडिलांकडे करण्याबाबत दटावणा:या घरातील मोलकरणीवर १४ वर्षीय मुलाने चाकूने प्राणघातक हल्ला करण्याची थरारक घटना आज चेंबूर येथे घडली. जखमी मोलकरणीवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून, मुलाला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
तेजस्वी शिंदे (वय ३५) असे या जखमी महिलेचे नाव असून, ती चेंबूरच्या घाटले गांव परिसरातील संभाजी नगरात राहते. चार महिन्यांपूर्वीच ही महिला कुटुंबीयांसोबत गावावरून मुंबईत आली आहे. महिनाभरापूर्वी एक घरकाम सुटल्याने गेल्या १५ दिवसांपासून ती सुभाष नगरमधील इमारत क्रमांक ३४ मधील घरात नोकरीला लागली.
या घरातील व्यक्तीचे पत्नीसोबत वाद असल्याने ते अनेक वर्षापासून आपल्या 14 वर्षाच्या मुलासोबत राहतात. आज सकाळी नेहमीप्रमाणो घरकाम करणारी तेजस्वी घरकामासाठी त्यांच्या घरी गेली. तेव्हा मुलाचे वडील कामावर गेले असल्याने त्यांचा १४ वर्षाचा मुलगा घरात एकटाच होता. दोन दिवसांपासून तो शाळेत न गेल्याने तेजस्वीने त्याला शाळेत न जाण्याचे कारण विचारले. त्यावरून मुलाचे आणि तेजस्वीचे भांडण झाले.
मुलाने दुरुत्तरे केल्याने ‘तुङया पप्पांकडे मी तुझी तक्रार करते,’ असा दम तिने त्याला दिला. त्यामुळे संतापलेल्या या मुलाने टीव्हीचा आवाज मोठा करून घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर घरातील धारदार चाकूने त्याने तेजस्वीवर वार करण्यास
सुरुवात केली. पहिला वार खांद्यावर केल्याने तेजस्वी जमिनीवर कोसळली. या संधीचा फायदा घेत तो तिच्या मानेवर बसला आणि सपासप वार केले.
तेजस्वीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र टीव्हीच्या आवाजामुळे तिचा आवाज बाहेर ऐकू गेला नाही. अखेर तेजस्वीने या मुलाला बाजूला करीत घराचे दार उघडून बाहेर पळ काढला. रक्तबंबाळ तेजस्वीला पाहून काही महिलांनी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. तेथे तिला दाखल करून त्यांनी ही महिती गोवंडी पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तेजस्वीचा जवाब नोंदवला. त्यानंतर मुलाला पोलिसांनी अटक केली.
मोलकरीण बोलली म्हणून हल्ला
चेंबूरमधील शाळेत नवव्या इयत्तेत हा मुलगा शिकत आहे. त्याची आई नवी मुंबईत राहत असल्याने वडील कामावर गेल्यानंतर तो घरी एकटाच असायचा. शाळेला दांडी मारून मित्रंसोबत घरी मौजमजा करायचा. ही बाब तेजस्वीने त्याच्या वडिलांना यापूर्वी एकदा सांगितली होती. त्याचाही राग मुलाच्या मनात होता. शिवाय ही मोलकरीण असताना मला बोलणारी कोण, असे त्याचे म्हणणो होते. त्या रागातूनच त्याने हा चाकूहल्ला केल्याची माहिती गोवंडी पोलिसांनी दिली.
(प्रतिनिधी)