Attack on Mohit Kamboj By Shivsena: मोहित कंबोज मुद्दाम तिथे आले, गाडीतून उरले अन्...आम्ही पाहिले; शिवसैनिकांनी केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:27 PM2022-04-22T22:27:00+5:302022-04-22T22:37:32+5:30
Attack on Mohit Kamboj By Shivsena: कंबोज म्हणतात, लग्नाला गेलेलो; शिवसैनिक म्हणतात तिथे त्यांच्यासाठी एवढा हायफाय हॉलच नाही.
मातोश्री बाहेर आधीच खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालिसा पठणावरून वातावरण तापलेले असताना उद्धव ठाकरेंवर टीका करणारे भाजपा नेते मोहित कंबोज तिथे पोहोचले होते. यामुळे शिवसैनिकांनी कंबोज यांच्या कारवर हल्ला केला. यामुळे तेथील वातावरण आणखी चिघळले होते.
मोहित कंबोज कलानगरमधून घरी जात होते. हा रस्ता तिथे जात नाही. कलानगरात कंबोजसारख्यांच्या राहणीमानाप्रमाणे हायफाय हॉल नाहीत. खोटे सांगत आहेत. मोहित कंबोज मुद्दामहून तिथे आले होते. गाडीतून उतरले आणि फोटो काढत होते. शिवसैनिकांनी अडविले आणि पकडण्यासाठी गेले असता ते गाडीत बसून पळून गेले, त्यांच्या गाडीत हॉ़कीस्टीक हत्यारे होती, असे तेथील शिवसैनिकांनी सांगितले. एबीपीला घटनास्थळावरील शिवसैनिकांनी ही माहिती दिली आहे. कंबोज यांनी एसपींनाही ढकलल्याचा आरोप त्यांनी केला.
कंबोज यांनी आपण लग्नाला गेलो होतो असे सांगितले. या लग्नाला एक मंत्रीदेखील आले होते. मुंबईत असा हल्ला होत असेल तर त्याहून शरमेची बाब नाही. शेकडो शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. कलानगरयेथील पुलाजवळ हा हल्ला झाला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी.
सुनो गौर से दुनिया वालों
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 22, 2022
बुरी नज़र ना हमपे डालो….
ना झुकेंगे
ना रुकेंगे
ना डरेंगे
ना थकेंगे…
छत्रपति शिवाजी महाराज के सैनिक है
आपके भ्रष्टाचार के ख़िलाफ़ लड़ते रहेंगे. pic.twitter.com/oT1LqlecKC
तर शिवसेना आमदार सुर्वे यांनी मोहित कंबोज मातोश्रीबाहेर वातावरण तापलेले असताना तिथे कशासाठी आले होते? तेथील वातावरण बिघडलेले आहे हे सर्वांना माहिती आहे. यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू होता, असा आरोप केला आहे. तर भाजपाचे आमदार भातखळकर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
या हल्ल्यात कंबोज यांच्या महागड्या एसयुव्हीचा आरसा, दरवाजावर लाथा आणि अन्य भागाची मोडतोड करण्यात आली आहे.