वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरू

By admin | Published: September 3, 2016 02:00 AM2016-09-03T02:00:43+5:302016-09-03T02:00:43+5:30

पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांत तब्बल चार पोलिसांवर हल्ले झाले आहेत. कुलाबा, व्ही.बी. नगर पाठोपाठ भायखळा आणि अंधेरीतही पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली.

The attack session of the traffic police started | वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरू

वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरू

Next

मुंबई : पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांत तब्बल चार पोलिसांवर हल्ले झाले आहेत. कुलाबा, व्ही.बी. नगर पाठोपाठ भायखळा आणि अंधेरीतही पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली.
वाहतूक विभागात कार्यरत असलेले महादेव कुंभार हे नेहमीप्रमाणे माझगावमधील डॉॅकयार्ड रोड सिग्नलवर वाहतुकीचे नियमन करत होते. या वेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणाने सिग्नल जंप केल्याचे कुंभार यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच या तरुणाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणाने कुंभार यांच्या अंगावरच गाडी घालून पळ काढला. अन्य सहकाऱ्यांनी तत्काळ जखमी अवस्थेतील कुंभार यांना उपचारांसाठी दाखल केले. या प्रकरणी समीर अहमद कुरेशी (१८) याला अटक करण्यात आल्याचे भायखळा पोलिसांनी सांगितले. अंधेरी स्थानक परिसरात गाडी अडविल्याच्या रागातून ट्रॅफिक वार्डन विश्वनाथ राणे यांना शिवीगाळ करत धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी चालक जरीवाला याला अटक केली. (प्रतिनिधी)

‘तो’ अचलपूरचा सभापती
गेट वे आॅफ इंडिया येथे कर्तव्य बजावत असलेले राजेंद्र पवार यांना मारहाण झाली. त्यांना मारहाण करणारा राजेंद्र मधुसुदन लोहिया हा अमरावतीतील अचलपूरचा सभापती असल्याची माहिती तपासात समोर आली. नगरसेवकपदी तो दुसऱ्यांदा निवडून आला आहे. काँग्रेस पक्षाचा
तो नगरसेवक आहे.

Web Title: The attack session of the traffic police started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.