मेंढपाळांचा वनरक्षकांवर हल्ला
By admin | Published: August 12, 2015 11:03 PM2015-08-12T23:03:16+5:302015-08-12T23:03:16+5:30
संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यातील घटना; वनरक्षकांचा हवेत गोळीबार !
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात मेंढय़ांना चरण्यास मनाई करणार्या वनरक्षकांवर मंगळवारी मेंढपाळांनी हल्ला चढविला. स्वत:चा बचाव करण्यासाठी वनरक्षकांनी हवेत गोळीबार केला. अंबाबरवा अभयारण्यात कालवण येथील अतिसंवदेनशील समजल्या जाणार्या सर्वे नं. ४४ मध्ये मंगळवारी सायंकाळी मेंढय़ांच्या कळप चरत होता. गस्तीवरील अकोट वन्यजीव विभागाच्या पथकाने मेंढय़ांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. तेवढय़ाच अंधाराचा फायदा घेत, मेंढपाळांनी पथकातील वनरक्षकांवर हल्ला केला. मेंढपाळांचा मोठा जमाव अंगावर धावून आल्याने वनरक्षकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यानंतर मेंढपाळ पळून गेले. ताब्यात घेतलेल्या १८६ मेंढय़ांना अकोटच्या वन्यजीव विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे.