खोटे फोटो प्रसारित करून चित्रा वाघ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 26, 2021 09:06 PM2021-02-26T21:06:09+5:302021-02-26T21:10:54+5:30

ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, पितळेची नाही, तांब्याची नाही, तेव्हा संशोय निर्माण होतो. (Sudhir Mungantiwar on Sanjay Rathod)

Attempt to defame Chitra Wagh by broadcasting fake photos, Mungantiwar's serious allegations against state government | खोटे फोटो प्रसारित करून चित्रा वाघ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

खोटे फोटो प्रसारित करून चित्रा वाघ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Next
ठळक मुद्देराज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. संजय राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात अन्याया विरोधात आवाज उठवणं गुन्हा झालाय का? - चित्रा वाघ

मुंबई - राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अक्षरशः राण उठवले आहे. त्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव घेत थेट आरोप करत आहेत. मात्र, आता राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. यावर बोलताना, चित्रा वाघ आवाज उचलत असल्याने सरकार त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव सरकारवर केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. (Attempt to defame Chitra Wagh by broadcasting fake photos, Mungantiwar's serious allegations against state government.)

"चित्राताई वाघ आवाज उचलत आहेत म्हणून सरकार त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने, असे खोटे-नाटे चित्र प्रसारित केले जात असतील तर, तो महाराष्ट्राचा अवमान आहे. पोलीस यंत्रणेने याची चौकशी करून दोशींवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे," असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

...त्यांना आपण सोन्याची अंगठी दोतो तेव्हा संशय निर्माण होतो - 
ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, पितळेची नाही, तांब्याची नाही, तेव्हा संशय निर्माण होतो. हा संशय चौकशीच्या माध्यमाने दूर करायला हवा. जर निष्पाप असेल तर कारवाई होता कामा नये आणि दोशी असेल तर सुटता कामा नये. त्यामुळे चौकशी होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला समजावली शिवशाही - 
यावेळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे सरकारला शिवशाहीही संजावली. मुनगंटीवार म्हणाले, "छत्रपती शिवजी महाराजांचा आम्ही मंत्रालयात फटो लावतो अथवा विधान भवनात जाताना आम्ही शिवरायांचं दर्शन घेऊन विधानभवनात प्रवेश करतो, ते यासाठी, की महाराजांना आम्ही विश्वास देतो, की तुमच्या या रयतेच्या राज्यात तुम्ही जरी आमच्यात नसले, तरी तुमचा विचार आम्हाला दिशा देतो. कोणत्याही महिलेवर अन्यात, अनाचार झाला, तर रांझ्याच्या पाटलाची जी दशा झाली, तीच आम्ही तुमच्या या रयतेच्या राज्यात केल्याशिवाय राहणार नाही, ही भावना त्या मागे असते.

राज्यात अन्याया विरोधात आवाज उठवणं गुन्हा झालाय का?
व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. यासंदर्भात एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का? असे मला विचारायचे आहे. जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची आणि हे तुम्ही बघितले मॉर्फ केलेले फोटो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

...तोपर्यंत सहन करावेच लागणार -
वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंटचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

 

Web Title: Attempt to defame Chitra Wagh by broadcasting fake photos, Mungantiwar's serious allegations against state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.