‘सनातनला अडकवण्याचा प्रयत्न’
By admin | Published: June 12, 2016 04:01 AM2016-06-12T04:01:21+5:302016-06-12T04:01:21+5:30
अंनिस’चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक डॉ. विरेंद्र तावडेवरील सर्व आरोप सनातनने फेटाळून लावले आहेत. ‘सनातन’चे प्रवक्ते अभय वर्तक
मुंबई : ‘अंनिस’चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक डॉ. विरेंद्र तावडेवरील सर्व आरोप सनातनने फेटाळून लावले आहेत. ‘सनातन’चे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत यासंबधी माहीती दिली. भाजपाचे सरकार असले तरीही पुरोगामी मंडळींच्या दबावामुळे त्यांच्याकडूनही हिदुत्ववाद्यांचा छळ सुरू आहे. साधकांना सीबीआय खोट्या गुन्ह्यात अडकवित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी यापूर्वी नागोरी व खंडेलवाल नावांच्या दोघांना अटक झाली होती. त्यांच्याकडून पिस्तुल जप्त केले होते, त्यामुळे तावडेंची पहिली अटक हा प्रसार चुकीचा असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)