अतिरिक्त पाणीवापराबाबत प्रयत्नशील

By admin | Published: April 17, 2016 02:03 AM2016-04-17T02:03:33+5:302016-04-17T02:03:33+5:30

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे.

Attempt to use excess water | अतिरिक्त पाणीवापराबाबत प्रयत्नशील

अतिरिक्त पाणीवापराबाबत प्रयत्नशील

Next

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे.
‘टाटांच्या सहा धरणातील पाणी दुष्काळी भागाला द्या,’ असे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर कंपनीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. टाटा पॉवर जलाशयातील पाणी विविध गरजांसाठी वापरले जाते. कात्रज, कोलाड, रोहा, मुळशी, पौड विभाग येथील सिंचन गरजा भागविण्यासाठी आणि पाताळगंगा, रासायनी, रोहा, बदलापूर या क्षेत्रातील औद्योगिक गरजा भागविण्यासाठी सहाही धरणांतील पाण्याचा उपयोग होतो. मुंबईला वीजपुरवठा करण्याच्या मुख्य उद्दीष्टासह इतर अनेक कामांसाठी या जलाशयांतील पाण्याचा वापर व्हायला लागला आहे. यंदा पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे गरज भागवून उरणारे पाण्याचा कसा योग्य वापर करता येईल यासाठी कंपनीचे अधिकारी पुणे तसेच रायगड जिल्ह्यातील सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाच्या गरजा भागविण्यासाठी टाटा पॉवरने नेहमीच पुढाकार घेतला आहे. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर निर्माण झालेली भीषण परिस्थिती तसेच देशात विविध ठिकाणी आलेले पूर, चक्रीवादळ आदी आपत्तींच्या वेळी टाटा पॉवरने मदतीचा हात पुढे केला होता. दुष्काळी परिस्थितीविषयी आम्ही तितकेच संवेदनशील आहोत, असेही नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Attempt to use excess water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.