राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

By admin | Published: August 8, 2014 11:17 PM2014-08-08T23:17:36+5:302014-08-08T23:17:36+5:30

धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरील आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे.

Attempts to create a political party | राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Next
>पिंपरी : धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरील आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे. काही राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत,  असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
पिंपरीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते आले होते. पवार  म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जातीच्या सूचीत समावेश करावा, अशी धनगर समाज संघटनांची मागणी आहे.  परंतु लोकशाही पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे. कायदा हातात घेणो उचित नाही. कोणत्याही समाज घटकाला आरक्षणाच्या सूचीत समाविष्ट करण्याचे अधिकार घटनात्मक तरतुदीनुसार संसदेला आहेत. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. मातंग समाजानेही अनुसूचित जातीचे आरक्षण वाढवून द्यावे, अशी मागणी केली आहे. एका समाजघटकाच्या मागणीचा विचार करत दुस:याच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका घ्यावी लागते. ओबीसी, एससी, एसटीच्या 52 टक्के आरक्षणाला कोणतीही बाधा न पोहोचवता, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
 
भाजप नेत्यामुळे मदत नाकारली : पवार
मावळ तालुक्यातील एका भाजपच्या नेत्याचे ऐकून गोळीबार प्रकरणातील मृताच्या वारसांनी राज्य शासनाची नोकरी व आर्थिक मदत धुडकावून लावली, असा गौप्यस्फोट  करत 
पवार म्हणाले, गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतक:यांच्या वारसांना नोकरी व आर्थिक मदत देण्याचे आम्ही आश्वासन दिले
होते. तसेच त्यांची भेट घेऊन याबाबत त्यांना सांगितले होते.
 
रेडणीत बंद
रेडणी : रेडा (ता. इंदापूर) येथे   काँग्रेस युवक सरचिटणीस अजित देवकर यांच्या नेतृत्त्वाखाली करून शाई टाकणा:यांचे प्रतिकात्मक पुतळयांचे दहन करण्यात आले. काटी आणि वडापुरी गावातही या घटनेनंतर त्वरित बाजारपेठ बंद करून निषेध व्यक्त केला. या वेळी सचिन तरंगे, स्वाधीन खाडे, दिनकर खाडे, चंद्रकांत भोसले उपस्थित होते.
 
अन् समोरासमोर भिडले
काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्याची निषेध फेरी मदनवाडी चौफुला येथील उड्डाणपुलाखाली आली. 
या वेळी निषेध फेरीतील कार्यकर्ते व त्या ठिकाणी उभे असलेल्या दुस:या गटातील कार्यकर्ते घोषणा देत एकमेकांवर धावून जात होते.
तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी तत्परता दाखवत 
दोन्ही गटांना शांत केले. भिगवणमध्ये दिवसभर तणाव होता. 
 
इंदापूरच्या पश्चिम भागात बंद  
वालचंदनगर/लासुण्रे : वालचंदनगर परिसरात कार्यकत्र्यानी बाजारपेठा बंद करण्याचे आवाहन केले. जंक्शन चौकात रास्ता रोको करण्यात आला. रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्याचा प्रय} केला.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर यांनी कार्यकत्र्याना शांतता राखण्याचे व सरकारी वाहनांची नि मालमत्तेची नुकसान न करण्याचे आवाहन केले. एसटी बस सेवा सुरू ठेवण्यात आली होती. 
जंक्शन चौकात माजी सरपंच वसंत मोहोळकर, माजी सरपंच राजकुमार भोसले, रोहित मोहोळकर, ¨पटु शिरसट, राजु बेंद्रे, मंगेश ¨शदे, सुयश गोरे, अक्षय वाघ, विठ्ठल गावडे, मुन्नाभाई मुलाणी, सागर ¨शंदे, संदीप साळुंखे, अनिल कोंडे, दिपक भुजबळ, प्रमोद यादव, देवानंद लोंढे, दत्तात्रय वाघमारे, महेश डाळे, पप्पु जठार कार्यकत्र्यानी निषेध नोंदवून बंद मध्ये सहभागी घेतला.
इंदापूर तालुक्याच्या वालचंदनगर, जंक्शन, लासुण्रे, बेलवाडी आदी पश्चिम भागात बंद पाळण्यात आला. इंदापूर तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गणोश फडतरे यांनी निषेध केला आहे. 
 
टायर पेटवले; दगडफेक
इंदापूर शहरासह बावडा, भिगवण, वालचंदनगर, गलांडवाडी नं. 1, पळसदेव, लोणी-देवकर आदी ठिकाणी बंद पाळण्यात आला. इंदापूर शहरात, महाविद्यालय समोर, महामार्गावर टायर पेटविण्यात आले. एस. बी. पाटील शिक्षण संकुलासमोर दगडफेक झाली.
 

Web Title: Attempts to create a political party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.