शालेय मैदानावर १ तास उपस्थित राहा, १० गुण मिळवा- क्रीडामंत्री विनोद तावडे

By admin | Published: June 19, 2016 09:33 PM2016-06-19T21:33:24+5:302016-06-19T21:33:24+5:30

प्रत्येक मुलगा किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित राहिला तर त्या मुलाला शाळेमध्ये १० गुण द्यायला पाहिजेत

Attend 1 hour at the school ground, get 10 points - Sports Minister Vinod Tawde | शालेय मैदानावर १ तास उपस्थित राहा, १० गुण मिळवा- क्रीडामंत्री विनोद तावडे

शालेय मैदानावर १ तास उपस्थित राहा, १० गुण मिळवा- क्रीडामंत्री विनोद तावडे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 - प्रत्येक मुलगा किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित राहिला तर त्या मुलाला शाळेमध्ये १० गुण द्यायला पाहिजेत, असे वक्तव्य राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. दादर, शिवाजी पार्क येथील ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने आयोजित केलेल्या ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराचे नुकताच उद्घाटन समारंभ राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी समर्थच्या मल्लखांबपटूंनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. ती प्रात्यक्षिके पाहून तावडे म्हणाले की, प्रत्येक मुलगा किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित राहिला तर त्या मुलाला शाळेमध्ये १० गुण द्यायला पाहिजेत, तसेच विविध खेळांमधील चांगल्या खेळाडूंसाठी मोठ्या संख्येने चांगल्या नोकऱ्याही निर्माण झाल्या पाहिजेत व मी स्वत: त्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन उपस्थितांना दिले.
मैदानावर मुलांनी खेळांचा सराव केला तरच खेळाडू तयार होतील; शिवाय मुले मोबाईल व टीव्हीपासून आपसूकच दूर होतील. खेळाडू आर्थिकृदृष्ट्या सक्षम असेल तर त्याची खेळात नक्कीच चांगली प्रगती होते. खेळाडूंना आर्थिकतेने सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी लवकरच ठोस पावले उचलण्याचे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले.
मल्लखांबातील पहिले छत्रपती पुरस्कार विजेते व सध्या मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्यवाह दत्ताराम दुदम हे देखील समारंभाला उपस्थित होते. या शिबिरात ३२५ विद्यार्थी सहभागी झाले असून, करंजगाव तसेच कोठुरे, निफाड, नाशिक येथील १२ तर कलाकार ट्रस्ट, दिल्ली या संस्थेतील २ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षकांचा सत्कार

समर्थचे ज्येष्ठ आजीव सभासद व ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक सुधाकर देखणे यांचा आणि त्यांच्या पत्नी आशाताई देखणे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन खास सत्कार करण्यात आला. वयाच्या ८० व्या वर्षी देखील कार्यरत असलेल्या देखणे सरांनी समर्थचे संस्थापक व्यायाम महर्षी प्र. ल. काळे गुरुजी यांनी दिलेल्या व्यायामाच्या बाळकडूला सर्व श्रेय दिले.

Web Title: Attend 1 hour at the school ground, get 10 points - Sports Minister Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.