फणसाड अभयारण्याचे पर्यटकांना आकर्षण

By admin | Published: April 19, 2016 01:58 AM2016-04-19T01:58:12+5:302016-04-19T01:58:12+5:30

निसर्गसौैंदर्य समृद्ध मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. जगभरातील पर्यटक येथील निसर्गसौंदर्य वनसंपदा

Attractions of tourists to Phansad Wildlife Sanctuary | फणसाड अभयारण्याचे पर्यटकांना आकर्षण

फणसाड अभयारण्याचे पर्यटकांना आकर्षण

Next

गणेश चोडणेकर, आगरदांडा
निसर्गसौैंदर्य समृद्ध मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. जगभरातील पर्यटक येथील निसर्गसौंदर्य वनसंपदा, वन्यजीव प्राणी व पक्षी यांच्या सान्निध्यातील मनमुराद आनंद लुटण्यासाठी भेटी देत असतात. सध्या शाळांना उन्हाळी सुट्या लागल्याने पर्यटकांची मोठी गर्दी येथे दिसून येत आहे. या अभयारण्यात ७१८ प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे सस्तन प्राणी, १६४ प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, २७ प्रकारचे साप, औषधी वृक्ष या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शुद्ध हवा, गारवा या निसर्ग किमयेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. मुंंबईपासून १५४ किमी अंतरावर विस्तारलेल्या या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानचे नबाब यांचे मालकीचे शिकार स्थळ म्हणून सदर जंगलाचा वापर होत असे. या ठिकाणच्या जैवविविधतेचे संरक्षण व्हावे व निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रुवारी १९८६ मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. जंगल संरक्षण, वन्यजीवांचे संवर्धन व व्यवस्थापन यासाठी ठाणे यांच्याकडे १९९४ मध्ये हस्तांतरित करण्यात आले. या अभयारण्यात ९० प्रकारची फुलपाखरे येथे आनंदाने बागडताना दिसतात. ज्यात प्रामुख्याने ब्लू मॉरगॉन, मॅप तसेच या ठिकाणी १७ प्रकारचे वन्यप्राणी यामध्ये रानससा, सांबर, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू येथे हमखास दृष्टीस पडते. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेला हा झुबकेदार शेपटीचा प्राणी उंच झाडावर आढळतो यांची घरटी वैशिष्ट्यपूर्ण असतात. पिसोरी हे जगातील सर्वात लहान हरीण म्हणून ओळखले जाते. तसेच अनेक वन्यश्वापदे आढळतात.

Web Title: Attractions of tourists to Phansad Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.