‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया; पुण्यातील 'डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी'तर्फे यंत्राची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 07:39 PM2020-05-02T19:39:27+5:302020-05-02T19:42:13+5:30

धातु, वस्तू, कापड आदींना करता येणार विषाणूमुक्त

Atulya will be doing destroy of corona virus; Manufacture of machine by Pune 'Diet'institute | ‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया; पुण्यातील 'डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी'तर्फे यंत्राची निर्मिती

‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया; पुण्यातील 'डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी'तर्फे यंत्राची निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देहे यंत्र बनवण्याचा खर्च फक्त ४ हजार ५०० रुपये या यंत्राचे वजन केवळ ३ किलो असल्याने ते कुठेही घेऊन जाता येणे शक्य

पुणे : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने प्रभावीत झाले असून या विषाणूपासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञ अभियंते विविध उपकरणे बनवत आहेत. असेच एक उपकरण पुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी (डायट) संस्थेने बनवले असून हे उपकरण कुठल्याही वस्तू, धातु आणि कपड्यांवरील कोरोनाच्या विषाणू नष्ट करू शकते. या उपकरणाचे 'अतुल्य' असे नामकरण करण्यात आले असून संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने (डिआरडीओ) मोठ्या प्रमाणात हे उपकरण बनविण्यास सांगितले आहे.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी विविध संस्था झटत आहेत. भारतात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या विषाणूपासून दुर राहण्यासाठी सॅनिटायझर यंत्र, माक्स, हेडशिल्ड संरक्षण आणि विकास संस्थेने या पूर्वी विकसीत केले आहे. मात्र, धातू, वस्तूंवरील विषाणू नष्ट करण्यासाठी संशोधन सुरू होते. पुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्लॉलॉजी (डायट) संस्थेने या पूर्वी या प्रकारच्या यंत्राची निर्मिती केली आहे. त्यामुळे वस्तूवरील विषाणू नष्ट करण्यासाठी एक प्रभावी उपकरण बनविण्यासाठी गेल्या २१ दिवसांपासून डायटचे तंत्रज्ञ झटत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
यापूर्वी डायटमध्ये कापूस, इंजेक्शन, सॅनिटरी पॅड, प्लॅस्टिक तसेच विविध आरोग्य उपकरांचे निर्जंतुकीकरण  करण्यासाठी यंत्र बनविले आहे. याच धरतीवर कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी त्यांनी अतुल्यह्ण या उपकरण तयार करण्यास सुरूवात केली. आधी बनविलेल्या निजंर्तूकीकरण यंत्रामध्ये बदल करून ये नवे यंत्र बनविले आहे. हे यंत्र मायक्रोव्हेव यंत्र आहे. एस-प्रोटीन सारख्या विषाणू नष्ट करण्यास हे यंत्र सक्षम आहे. या विषाणूचे आणि कोरोना विषाणू मिळता जुळता असल्याने दवाखाने, रेल्वे, तसेच विविध कार्यालयात या यंत्राचा वापर करून धातू, वस्तू आणि कापडांवरील विषाणू नष्ट करता येतात. या यंत्रातून ५५० ते ६०० डिग्री सेल्सिीअस तापमान तयार होत असून त्याद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येते.

.........................

कमी खर्चात यंत्र तयार....
हे यंत्र बनवायला लागणारा खर्च खुप कमी आहे. फक्त ४ हजार ५०० रुपए हे यंत्र बनवण्याचा खर्च आहे.  हाताने किंवा स्डँडवर बसवून याचा वापर करता येऊ शकतो. ३० सेकंद तसेच एका मिनिटात जमिनीवर, धातूवर या यंत्राद्वारे किरणांचा मारा करून निजंर्तूकीकरण करण्यात येते. या यंत्राचे वजन केवळ ३ किलो असल्याने ते कुठेही घेऊन जाता येणे शक्य आहे.
........................
हा विषाणू कोठेही असू शकतो. एखाद्या धातूवर हा विषाणू जिवंत राहू शकतो. त्याला हात लागल्यास त्याची लागण त्या व्यक्तीला होऊ शकते. यामुळे आम्ही कोरोनाचा विषाणू नष्ट करता येईल अशा यंत्राची निर्मिती करण्यास सुरूवात केली. या यंत्राची उपयोगीता पाहून डीआरडीओने याचे उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे.- सी. पी. रामनारायण, कुलगुरू, डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी.

Web Title: Atulya will be doing destroy of corona virus; Manufacture of machine by Pune 'Diet'institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.